संत चोखा मेळा पुण्यतिथी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, मे १७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २७, शके १९४७
सूर्योदय : ०६:०३ सूर्यास्त : १९:०७
चंद्रोदय : २३:२० चंद्रास्त : ०९:३२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – ०५:५७, मे १८ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – १७:४४ पर्यंत
योग : साध्य – ०७:०९ पर्यंत
करण : कौलव – १७:३९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०५:५७, मे १८ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : धनु – ००:०४, मे १८ पर्यंत
राहुकाल : ०९:१९ ते १०:५७
गुलिक काल : ०६:०३ ते ०७:४१
यमगण्ड : १४:१३ ते १५:५१
अभिजितमुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०६:०३ ते ०६:५५
दुर्मुहूर्त : ०६:५५ ते ०७:४८
अमृत काल : १२:३६ ते १४:१९
वर्ज्य : २:०७, मे १८ ते ०३:४७, मे १८

संत चोखा मेळा अभंग

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

अर्थ:

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़.

      म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये.  फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण.ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण फशी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही.आपले मीलन होणार नाही.

      म्हणून संत चोखा मेळा म्हणतात मी जरी वाकडा वाटले तरी माझा भाव भोळा, आहे सरळ आहे. 

।। पंढरीचे सुख नाही त्रिभूवनी। प्रत्येक चक्रपाणी उभा असे।।

मंगळवेढ्याला गावकुसाची भिंत बांधत असताना ती कोसळली. त्यात अनेक मजूर ठार झाले. यात चोखोबांचाही समावेश होता. तो दिवस वैशाख वद्य ५ शके १२६० होय. आठ दिवसानंतर संत नामदेवांनी ढिगाऱ्याखाली असलेल्या संत चोखोबांच्या अस्थीचा शोध घेवून त्या अस्थींना पंढरपूरला महाद्वारी समाधी दिली. तो दिवस म्हणजे वैशाख वद्य त्रयोदशी होय. ‘महाद्वारापुढे मला ठाव द्यावा’ ही प्रिय भक्ताची इच्छा विठ्ठलाने नामदेवाच्या हातून पूर्ण केली.

याबाबत संत जनाबाई आपल्या अभंगातून म्हणतात,

चोखामेळ्याची करणी। देव केला त्याने ऋणी।।

आज संत चोखा मेळा पुण्यतिथी आहे.

सुर्योदय व सुर्यास्तावेळी केलेया अग्नीहोत्राने वातावरणशुध्दी व पूर्णतया समर्पणची स्थिती निर्माण होते. सुर्योदयाच्या वेळी –

सुर्याय स्व: । सुर्य इदं मम ।
प्रजापते स्व:। प्रजापते इदं मम ।

सुर्यास्ताचे वेळी –
अग्नये नम: । अग्नये इदं मम ।
प्रजापते स्व: । प्रजापते इदं मम ।

१९१८ : आज अग्निहोत्र पुरस्कर्ते श्री गजानन महाराज, अक्कलकोट यांची जयंती आहे ( समाधी: ०६-१२-१९८७ )

आज जागतिक उच्च रक्तदाब दिन आणि जागतिक माहिती संस्था दिन आहे.

इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई – रत्नागिरीच्या हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरदेसाई यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. र्फग्युसनमध्ये प्रथम वर्ष पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. तेथे एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते इ. स. १८८८ मध्ये बी. ए. झाले. रत्नागिरीच्या शालेय शिक्षणात त्यांना त्यांचे मामा बळवंतराव आठल्ये यांची मदत झाली.

पदवी मिळाल्यानंतर सरदेसाई यांना बापूसाहेब आठल्ये यांच्या ओळखीने बडोदेकर संस्थानिक श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याकडे ‘रीडर’ म्हणून काम मिळाले. ते इ. स. १८८९ च्या सुरुवातीस या नवीन जबाबदारीच्या कामी रुजू झाले. महाराजांना वर्तमानपत्रे, पत्रे, पुस्तके इत्यादि वाचून दाखविण्याचे काम त्यांना करावे लागत असे. वर्षभरातच त्यांच्याकडे त्या वेळचे युवराज फत्तेसिंहराव यांना शिकवण्याचे काम सोपविण्यात आले. या कामगिरीची त्यांनी अगदी मनापासून तयारी केली. त्यासाठी ते शिकवावयाच्या विषयांची टिपणे काढीत. अशा टिपणांतूनच पुढे त्यांनी लिहिलेल्या रियासतींचा जन्म झाला.

महाराजांना टापटीप, रेखीव आणि व्यवस्थित कामाची आवड होती. तीच शिस्त सरदेसाई यांच्या अंगी बाणवली. ‘ट्यूटर’ म्हणून काढलेल्या इतिहासाची टिपणे अधिक विस्तारून इ. स. १८९८ मध्ये ‘मुसलमानी रियासत’ या नावाने प्रसिद्ध झाली. याबरोबरच त्यांनी मॅकिया व्हिली यांच्या ‘द प्रिन्स’ आणि प्रो. सिली यांच्या ‘एक्स्पान्शन ऑफ इंग्लंड’ या ग्रंथांचे भाषांतर केले. हे दोन्ही ग्रंथ ‘सयाजीराव महाराज ग्रंथमाला’ या मालेतून प्रसिद्ध झाले.

राजवाड्यातील नोकरी-बरोबर त्यांनी इतिहासाचा अभ्यास आणि लेखन चालूच ठेवले होते. ‘हिंदुस्तानचा अर्वाचीन इतिहास’ या मालेतील ‘मुसलमानी रियासत’ पूर्वार्ध, ‘मराठी रियासत’ पूर्वार्ध, मध्यविभाग तसेच ‘ब्रिटिश रिसायसती’चा पूर्वार्ध असे ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले. इ. स. १९२५ मध्ये त्यांनी महाराजांच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आणि नंतरचे सर्व आयुष्य पुणे-मुंबई मार्गावरील कामशेत येथे इंदायणी नदीच्या काठी आपल्या निवासस्थानी इतिहासलेखनाच्या तपश्चर्येत व्यतीत केले. ‘मराठी रियासती’चे पुढचे सर्व लेखन येथेच पूर्ण झाले.

सरदेसाई यांना डॉ. श्यामकांत व श्रीवत्स अशी दोन्ही मुलांच्या दुःखद निधनाचा आघात पचवत रियासतकारांनी त्यातूनही स्वत:चे मन आवरले आणि ‘इतिहासालाच त्यांनी आपला मुलगा मानलेला आहे.’ हे साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे उद्गार खरोखरच समर्पक होते. इ. स. १९४३ मध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई उर्फ माई यांचेही निधन झाले. असे सर्व कौटुंबिक आघात सोसूनही त्यांच्या लेखनात खंड पडला नाही.

इतिहासलेखनाच्या संदर्भात सरदेसाई यांची सर जदुनाथ सरकार यांच्याशी मैत्री झाली आणि ती मैत्री अखंड पन्नास वषेर् टिकली. अनेक विषयांवर त्यांचे मतभेद होते. तरी त्यांची मैत्री अतूटच राहिली. त्यांचे स्नेसंबंध घरोब्यापेक्षाही अधिक निकटचे होते. सर जदुनाथांनी सरदेसाई यांना ‘ग्रेटेस्ट लिव्हिंग हिस्टोरियन ऑफ द मराठाज’ असे गौरवाने म्हटले आहे. ते सरदेसाईंच्या कार्याचे योग्य असे मूल्यमापन म्हटले पाहिजे. या प्रदीर्घकालीन मैत्रीच्या संबंधातच त्यांनी पेशवे दप्तर, रेसिडेन्सी रेकॉर्डस, ग्वाल्हेरच्या पत्रसंग्रह इत्यादि कामे स्वीकारली. त्यात त्यांना जदुनाथ सरकारांचे बहुमोल सहकार्य मिळत गेले. जदुनाथ सरकारांनाही मराठ्यांच्या इतिसहासातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सरदेसाईंचे फार मोठे साहाय्य झाले.

सरदेसाई यांनी रियासतीचे एकूण तेरा खंड प्रकाशित केले. ‘मुसलमानी रियासती’च्या तीन आवृत्त्या काढल्या. ‘मराठी रियासती’च्या पूर्वार्धाच्या तीन व मध्यविभागाच्या दोन आवृत्त्या काढल्या. ‘ब्रिटिश रियासती’चे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन खंड प्रकाशित केले. ‘मराठी रियासती’वर आधारित न्यू हिस्ट्री ऑफ दी मराठाज’चे तीन खंड, तसेच, पाटणा विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानावर ‘मेन करंटस् ऑफ मराठी हिस्ट्री’, असे इंग्रजी ग्रंथ लिहिले.

याखेरीज त्यांनी विद्यार्थ्यांसाठी व मुलांसाठी ‘शालोपयोगी भारतवर्ष’, ‘बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास,’ ‘महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सोप्या गोष्टी’, ‘हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास’ लेखनाबरोबरच सरदेसाई यांनी पेशवे दप्तरातील कागदपत्रांचे संशोधन व संपादन करून ४५ खंड प्रकाशित केले. सर जदुनाथांच्या बरोबर ‘पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉन्डन्स’चे पाच खंड संपादित केले.

‘काव्येतिहास संग्रहा’तील परमानंदांच्या ‘अनुपुराणा’चे संपादन करून त्यांनी ‘गायकवाड ओरिएंटल सेरीज’मध्ये प्रकाशित केले. याखेरीज वेळोवेळी त्यांनी ऐतिहासिक तसेच वर्तमान महत्त्वाच्या विषयांवर विविध लेख नियतकालिकांमधून लिहिले. अशा लेखांची संख्या ३५० वर जाते. आपल्या विविध भाषणांच्या टिपणांचा त्यांचा संग्रही फार मोठा आहे.

१८६५: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर, १९५९)

  • घटना :
    १७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.
    १८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
    १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
    १९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.
    १९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
    १९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
    १९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
    २००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

• मृत्यू :

●१९७२: शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.
●१९९६: कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)
• २०००: जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन. ( जन्म : १५ जानेवारी, १९२१ )

●२०१४: द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

  • जन्म :
    १९४५: लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.
    १९५१: गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.
    १९७९: अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »