गाळप हंगाम १५ ऑक्टो.पासून सुरू होणार, मंत्रिसमिती बैठकीत निर्णय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : शुगरटुडे

यंदाचा ऊस गाळप हंगाम (२०२६-२७) येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गाळप हंगामासाठी ऑक्टाेबर योग्य की नोव्हेंबर यावरून साखर उद्योगात मतमतांतरे आहेत. मात्र सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात साखर कमी पडू नये, हा या निर्णयामागे राज्य सरकारचा उद्देश आहे.

यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय झाल्याच्या वृत्ताला साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दुजोरा दिला. राज्य शासनाच्या निर्णयानुसार यंदाचा साखर हंगाम यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. गाळप परवाने प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. कारखान्यांचा वेळ वाचण्यासाठी सर्व परवाने ऑनलाइन देण्याकडे आमचा कटाक्ष आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत गाळपाबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, साखर उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेचा दराने उसळी घेतली होती. ऑगस्टमधे साखरेचे दर 70 ते 75 रुपये किलो वर गेल्याच पाहिला मिळालं होतं. तर नोव्हेंबरपूर्वी गळीत हंगाम सुरू करायला शेतकरी आणि कारखान्यांच्या तोट्याचे असल्याचं कारखांदारांनी भूमिका घेतली होती. अशातच आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) सुरू करण्याची अधिकृत तारीख दरवर्षी राज्य शासनाच्या मंत्रिसमितीच्या बैठकीत निश्चित केली जाते. मागील १० वर्षांतील (हंगाम २०१७१८ ते २०२६२७)गाळप हंगाम सुरू होण्याच्या अधिकृत तारखा खालीलप्रमाणे आहेत:

साखर हंगाम (Year)गाळप हंगाम सुरू झाल्याची/होण्याची अधिकृत तारीख
२०२६२७१५ ऑक्टोबर २०२६
२०२५२६१ नोव्हेंबर २०२५
२०२४२५१५ नोव्हेंबर २०२४ (निवडणुकांमुळे प्रत्यक्ष गाळप नोव्हेंबर अखेरीस सुरू झाले)
२०२३२४१ नोव्हेंबर २०२३
२०२२२३१५ ऑक्टोबर २०२२
२०२१२२१ ऑक्टोबर २०२१
२०२०२११५ ऑक्टोबर २०२०
२०१९२०२२ नोव्हेंबर २०१९
२०१८१९२० ऑक्टोबर २०१८
२०१७१८१ नोव्हेंबर २०१७

महत्त्वाची नोंद: बहुतांश वेळा ऊस गाळप हंगाम हा ऑक्टोबरच्या मध्यावर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केला जातो. हवामान, मान्सूनचा परतीचा पाऊस, उसाची उपलब्धता आणि विधानसभा निवडणुका यांसारख्या कारणांमुळे या तारखांमध्ये दरवर्षी काही दिवसांचा बदल होत असतो.

मागील १० गाळप हंगामांत साखर आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) अधिकृत आकडेवारीनुसार झालेले एकूण साखर उत्पादन खालीलप्रमाणे आहे:

साखर हंगाम (Year)एकूण साखर उत्पादन (लाख मेट्रिक टन मध्ये)वैशिष्ट्ये / नोंदी
२०२६२७हंगाम सुरू होत आहे (अंदाजे ९० ९५ लाख टन)कमी पावसामुळे हंगाम लवकर आटोपण्याचा अंदाज.
२०२५२६९९.१८ लाख टनप्रतिकूल हवामान असूनही अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन.
२०२४२५११०.१७ लाख टनकोल्हापूर व पुणे विभागातील चांगल्या उताऱ्यामुळे मोठी वाढ.
२०२३२४११०.०० लाख टनसुरुवातीला दुष्काळाचा अंदाज होता, मात्र उत्पादन चांगले झाले.
२०२२२३१०५.०० लाख टनइथेनॉल निर्मितीकडे ऊस वळवल्यामुळे साखर उत्पादनात घट.
२०२१२२१३७.०० ते १३८ लाख टनमहाराष्ट्राच्या इतिहासातील विक्रमी सर्वोच्च उत्पादन.
२०२०२११०६.४० लाख टनचांगल्या पावसामुळे उत्पादनाने पुन्हा १०० लाख टनाचा टप्पा ओलांडला.
२०१९२०६१.६१ लाख टनमहापूर आणि त्यानंतरच्या दुष्काळामुळे उत्पादन प्रचंड घटले.
२०१८१९१०७.२१ लाख टनसलग दुसऱ्या वर्षी उसाची विक्रमी उपलब्धता झाली होती.
२०१७१८१०७.१० लाख टनत्या वर्षीच्या बंपर पिकामुळे उत्पादनात मोठी झेप घेतली होती.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »