यंदा उसाची पळवापळवी शक्य : साखर आयुक्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊस वाहतूक खर्च कमी करण्यासाठी कारखान्यांकडे आग्रह धरावा

पुणे : (Sugartoday Team) : यंदाची परिस्थती पाहता साखर काखान्यांनाकडून उसाची पळवापळवी होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी अन्य मार्ग वापरू नयेत, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.

‘शुगरटुडे’ला (sugartoday News Magazine) दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी आयुक्त गायकवाड यांनी साखर क्षेत्रासंदर्भातील विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.

ते म्हणाले, ‘साखर कारखान्याच्या वजनकाट्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संशय असल्यास त्यांनी आधी खासगी शासनमान्य प्रमाणित काट्यावर वजन करावे; त्याची पावती जपून ठेवावी आणि नंतर कारखान्याला ऊस न्यावा.

वजनामध्ये तफावत आढळल्यास ते प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार करू शकतात. एखाद्या शेतकऱ्याने हा मार्ग स्वीकारल्यास त्याला कारखान्याकडून भविष्यात कधी तरी चुकीची वागणूक मिळण्याची भीती असल्यास, शेतकऱ्यांनी समूहाने वजन खातरजमा करावी. जेणेकरून कारखान्यांचा त्रास होणार नाही. शिवाय त्यांना रीतसर तक्रार करण्याचा पर्याय आम्ही यंदापासून खुला केला आहे.’

या हंगामावेळी साखर कारखान्यांना ऊस कमी पडू शकतो. त्यामुळे उसाची पळवापळवी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या ऊस गाळपाचे नियोजन करावे. गैरमार्गाने किंवा कोणाला पैसे देऊन ऊस गाळपाची घाई करून नये. यंदा संयमानेच घ्यावे, असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.

ऊस वाहतूक आणि तोडणीचे साखर कारखान्यांचे दर सहाशे रूपयांपासून बाराशेपर्यंत आहेत. एवढी तफावत का, या प्रश्नाला सविस्तर उत्तर त्यांनी दिले. ‘ऊस तोडणी आणि वाहतूक दर कमीत कमी असावेत यासाठी शेतकऱ्यांनी आग्रह धरायला हवा. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या मुद्यावर चर्चा घडवून आणायला हवी’, अशी सूचनाही साखर आयुक्तांनी केली आहे.

ही मुलाखत सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…..

शेतकऱ्यांनीच स्वत: कारखान्यांना ऊसाऐवजी रस पुरवला तर, द्विस्तरीय दर रचना करण्यासाठी व्यावसायिक वापराच्या साखरेला कोणता रंग देणार आदी प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या….

https://www.youtube.com/watch?v=VCdvh9-_ZXg

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »