सल्फरविरहित साखरेसाठी नवे प्रयोग

पुणे : सल्फरविरहित साखर उत्पादन करण्यासाठी नवे प्रयोग सुरू आहेत. त्यालाही चांगले यशही मिळत आहे, अशी माहिती निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
साखरेचा शरीराची ऊर्जा राखण्यासाठी किंवा त्वरित ऊर्जेचा स्रोत म्हणून, शिवाय प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनही साखरेचा प्रचंड वापर होते. साखरेचे असे अनेक गुण आहेत. मात्र जादा साखर खाण्याचे तोटेही आहेत. तसे पाहिले तर कोणतेही पदार्थ अतिसेवनाचे तोटे असतातच.
साखर शुद्धीकरणासाठी कारखान्यांमध्ये सल्फरचा वापर होते. त्याचे प्रमाण सीमित ठेवले जाते. त्यामुळे ती खाण्यास अपायकारक ठरत नाही, परंतु काही व्याधी असेल, तर साखर सेवनावर मर्यादा येतात. साखर निर्मिती प्रक्रियेतून हा सल्फर काढून टाकण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे प्रमाण २० पीपीएम राखले जाते.
साखर शुद्धीकरणासाठी सल्फर नाहीच वापरला तर…. शेखर गायकवाड यांनी सांगितले की, सल्फर ऐवजी CO2 वापरून साखर शुद्धीकरणाचे प्रयत्न आपल्याकडेही सुरू आहेत. सध्या श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्ये चाचण्या सुरू आहेत. त्याचे परिणामही चांगले दिसून आले आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याकडील साखर शुद्धीकरण प्रक्रिया नव्या स्वरूपात येईल आणि साखरेतील सल्फरचा दोष पूर्णपणे निघून जाईल अशी आशा आहे.
मार्केटमध्ये सध्या बरेच सल्फरफ्री ब्रँड आहेत. मात्र येत्या काळात शुद्धीकरणाची प्रक्रियाच बदलल्यास सर्वच साखर सल्फरफ्री असेल, त्यामुळे साखरेची मागणी प्रचंड वाढेल.