‘त्या’ कारखान्यांना गाळप परवान्यासाठी कडक अटी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : थकीत एफआरपी देणाऱ्या साखर कारखान्यांना यंदा साखर आयुक्तालयाने दणका दिला आहे. 2026-27 चा गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील हंगामाची 100% एफआरपी आणि 2024-25 पर्यंतचे आरएसएफचे (महसुली वाटप) सर्व देणे चुकते करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या रकमा अदा केल्याचे प्रमाणपत्र गाळप परवाना अर्जासोबत जोडल्याशिवाय परवाना मिळणार नाही. त्यामुळे थकबाकी असलेल्या कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

1 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाळप परवान्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. परवाना शुल्क आणि सुरक्षा अनामत भरल्याची पावती अपलोड करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या अटी :

  1. परवाना घेतल्याशिवाय गाळप सुरू करता येणार नाही, केल्यास कायदेशीर कारवाई होणार.
  2. शासकीय थकबाकी – भागभांडवल, कर्ज, हमी शुल्क भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम द्यावा लागेल.
  3. नोंदणीकृत सर्व ऊसाची माहिती ऑनलाईन आणि ‘महा-ऊस नोंदणी’ अॅपवर अपलोड करणे बंधनकारक.
  4. पुरेसा ऊस असताना आयुक्तांच्या परवानगीशिवाय कारखाना बंद करता येणार नाही.

सहकारी कारखान्यांसाठी एनसीडीसीचा विनियोग दाखला देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »