पेट्रोल-इथेनॉल मिश्रण: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली: पेट्रोल पंपावर विक्री होणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे नेमके प्रमाण किती आहे, याची माहिती ग्राहकांना स्पष्टपणे मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी, ३१ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल.


याचिकाकर्ते नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी मागणी केली आहे की, इंधनाच्या प्रत्येक बिलावर पेट्रोलमधील इथेनॉलची टक्केवारी सहज वाचता येईल अशा पद्धतीने लिहिलेली असावी . तसेच, वाहनांच्या प्रकारानुसार (उत्पादक, मॉडेल, इंजिन प्रकार आणि निर्मिती वर्ष) कोणत्या वाहनासाठी कोणते इथेनॉल मिश्रण योग्य आहे, याचा एक अधिकृत सार्वजनिक डेटाबेस केंद्र सरकारने तयार करावा याशिवाय, पेट्रोलियम मंत्रालय, रस्ते वाहतूक मंत्रालय, भारतीय मानक ब्युरो (BIS) आणि स्वतंत्र ऑटोमोबाईल तज्ज्ञांची एक समिती स्थापन करून, सध्याच्या वाहनांवर ‘ई-२०’ इंधनाचा काय परिणाम होतोय याची पाहणी करावी आणि त्याचा सार्वजनिक अहवाल सादर करावा, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »