फ्लेक्स-इंधन वाहनांवर सरकारसोबत काम : टोयोटा

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) चे उपाध्यक्ष पीबी वेणुगोपाल म्हणाले, टोयोटाने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-इंधनक्षम मजबूत हायब्रिड वाहनासाठी भारतात पायलट प्रकल्प सुरू केला आहे. फ्लेक्स-इंधन वाहनासाठी आम्ही सरकारसोबत काम करत आहोत.
ते म्हणाले, भारतात आता आम्ही स्व-चार्जिंग हायब्रीड वाहने सादर केली आहेत. आम्ही सर्व तंत्रज्ञानाचा विचार करत आहोत आणि ते भारतात आणण्यासाठी योग्य वेळेचा विचार करत आहोत.
कोविड -19 के नंतर ऑटोमोबाइल क्षेत्रात मागणी वाढली आहे. प्रतीक्षा कालावधी काय आहे आणि तुमचे इनोव्हा क्रिस्टा गाडीचे बुकिंग कधी सुरुवात होणार आहे? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, आम्ही गेल्या ऑगस्टपासून इनोव्हा क्रिस्टाचे बुकिंग बंद केले आहे. गाडीची प्रचंड मागणी आहे आणि आम्ही तेवढा पुरवठा करू शकत नाही, त्यामुळे या गाडीची बुकिंग आम्ही थांबवली. भविष्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ.