आंतरराष्ट्रीय बालदिन

आज रविवार, जून १, २०२५ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ ११, शके १९४७
सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : १०:५७ चंद्रास्त : ००:०८ (जून २)
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – १९:५९ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – २१:३६ पर्यंत
योग : ध्रुव – ९:१२ पर्यंत
करण : कौलव – ०८:०० पर्यंत
द्वितीय करण : तैतिलीय – १९:५९ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १७:२९ ते १९:०८
गुलिक काल : १५:५० ते १७:२९
यमगण्ड : १२:३३ ते १४:११
अभिजित मुहूर्त : १२:०६ ते १२:५९
दुर्मुहूर्त : १७:२२ ते १८:१५
अमृत काल : १९:५८ ते २१:३६
(सर्व वेळा या पुण्याच्या अक्षांश व रेखांशाप्रमाणे आहेत)
आज आंतरराष्ट्रीय बालदिन, जागतिक पालकदिन व जागतिक दूध दिन आहे
- १९९६: भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)
- वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.
- १९९८: ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१६)
माधवरावांच्या पत्रकारितेची सुरुवात त्यांच्या शालेय जीवनातच झाली. अगदी नौपाडा मिडल स्कूलमध्ये आठवीत असताना त्यांनी ‘कल्पकथा’ नावाच्या हस्तलिखित मासिकाचे “संघटन – संपादन” केले होते.त्यानंतर त्यांनी ‘निर्झर’ हे मासिक आधी हस्तलिखित आणि नंतर छापील स्वरूपात चालविले. त्याची सुरवात ५ नोव्हेंबर १९४५ रोजी झाली. पाच-सहा अंक निघून ते बंद झाले. माधवरावांच्या वडिलांनी पोर्ट ट्रस्ट मधून निवृत्त झाल्यावर स्वतःचा छापखाना काढला होता. तेथेच छपाई होत असे. त्यानंतर ‘क्षितिज’ मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हे मासिक तीन वर्षे चालले. त्यात अनेक नामवंत लेखकांनी लेखन केले. त्यानंतर गडकरी यांच्या संपाद्कत्त्वाखाली ‘निर्धार’ हे साप्ताहिक सुरु झाले. तेही जानेवारी १९५३ ते १९५५ अखेर, असे जवळजवळ तीन वर्षें चालले.
१ एप्रिल १९५६ रोजी माधव गडकरी दिल्लीला आकाशवाणीच्या मुख्यालयात संदर्भ व संशोधन अधिकारी म्हणून रुजू झाले. तेव्हाचे माहिती व प्रसारण सचिव श्री. पु. मं. लाड यांनी गडकरींची निवड केली होती. एप्रिल १९६२ पर्यंत म्हणजे सहा वर्षे ते दिल्लीत होते. माधवरांच्या दिल्लीतील वास्तव काळातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे त्यांच्या पुढाकाराने तेथे भरलेले मराठी नाट्यसंमेलन.
१९६२ च्या सुरवातीस ‘टाइम्स ऑफ इंडिया ‘ समूहाने मराठी वृत्तपत्र काढण्याचे ठरविले. मराठी टाइम्स चे पहिले संपादक म्हणून व्दा.भ. कर्णिक यांची नियुक्ती झाली. त्यांनी माधव गडकरी यांची निवड मुख्य उपसंपादक म्हणून केली. आपल्या पुस्तकात गडकरी म्हणतात ही मूळ योजना २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्र टाइम्स सुरु करण्याची होती. परंतु वृत्तपत्रीय कागदाबद्दलच्या अडचणीमुळे तसे होऊ शकले नाही आणि महाराष्ट्र टाइम्स चा पहिला अंक त्यानंतर सुमारे ५ महिन्यांनी, म्हणजे १८ जून १९६२ रोजी प्रसिद्ध झाला. त्या दिवसापासून सुमारे ५ वर्षं गडकरी महाराष्ट्र टाइम्स मध्ये होते.
महाराष्ट्र टाइम्समध्ये ५ वर्षे राहिल्यानंतर १ जून १९६७ रोजी माधव गडकरी गोव्याच्या ‘दैनिक गोमंतक’ चे संपादक झाले. १३ नोव्हेंबर १९७६ पर्यंत ते गोव्यात होते. या काळात त्यांनी “गोमंतक स्थिर पायावर उभा करण्याचा प्रयंत्न केला “. त्यांच्या काळात ‘गोमंतक’ चा खप वाढला नवीन इमारत उभी झाली, नवीन यंत्रसामग्री आली, कुडाळहून कोकण आवृत्ती निघू लागली. दैनिक गोमंतक – आणि रविवार गोमंतक – हे एक मराठी वृत्तपत्र म्हणून प्रस्थापित झाले.
‘रविवारचा दृष्टीक्षेप’ हे एक महत्वाचे सदर माधवरावांनी ‘रविवार गोमंतक’ मध्ये १९६७ मध्ये सुरु केले ते पुढे ‘मुंबई सकाळ ‘ आणि ‘लोकसत्ता’ मधेही चालू ठेवले. या सदरातील लेखात आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रातील विषयांना ते स्पर्श करीत. (यांपैकी ‘रविवार गोमंतक ‘ मध्ये लिहिलेल्या लेखांची एकूण संख्या ३२० आहे.) यातील निवडक लेख ‘दृष्टीक्षेप’ च्या तीन खंडात प्रसिध्द झाले. १५ नोव्हेंबर १९७६ रोजी गडकरी ‘मुंबई सकाळ’ मध्ये स्थानीय संपादक म्हणून रुजू झाले. ‘मुंबई सकाळ’ चा खप वाढविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ शी त्यांची स्पर्धा होती. रुजू झाल्यावर चारच दिवसांनी म्हणजे १९ नोव्हेंबर १९७६ पासून त्यांनी ‘चौफेर’ हे दैनिक सदर चालू केले. या सदरात, त्यांच्या शब्दात ” एकीकडे समाज – प्रबोधन, दुसरीकडे विचार-मंथन असा एक धागा ” त्यांनी सतत जपला.
२ एप्रिल १९८४ रोजी माधव गडकरी ‘लोकसत्ता’ चे संपादक म्हणून रुजू झाले. २४ सप्टेंबर १९९२ पर्यंत, म्हणजे सुमारे साडेआठ वर्षे ते संपादकपदी होते. ह्या कारकीर्दीने त्यांच्या पत्रकारितेतील कार्यावर कळस चढविला. ह्याही काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे विषय हाताळले, त्यांना तोंड फोडले, सार्वजनिक हितासाठी वाद ओढवून घेतले, त्यातून त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या बेअदबीचे दोन खटले झाले, ते त्यांनी जिद्दीने लढविले, हा सर्व वृत्तांत त्यांनी आपल्या पुस्तकात तपशिलाने कथन केला आहे.
गडकरी संपादकपदावर असतानाच २८ सप्टेंबर १९८८ रोजी ‘लोकसत्ता’ ची पुणे आवृत्ती सुरु झाली, त्याचप्रमाणे ६ एप्रिल १९९२ रोजी नागपूर आवृत्ती सुरु झाली.(यथावकाश अहमदनगर, औरंगाबाद आणि दिल्ली आवृत्त्याही सुरु झाल्या.) याशिवाय निवृत्तीपूर्वी काही काळ गडकरी ‘लोकसत्ता ‘ बरोबरच साप्ताहिक ‘लोकप्रभा’ चेही संपादक होते.
गडकरी ‘लोकसत्ता’ चे संपादक असताना त्यांनी पुढाकार घेऊन दोन महत्वाचे उपक्रम यशस्वी केले. त्यांतील पहिला म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या ‘सामाजिक परिषद’ या संस्थेचे पुनरुज्जीवन आणि दुसरा म्हणजे जागतिक मराठी परिषदेची स्थापना आणि तिची पहिली दोन अधिवेशनें.
माधवरावांनी हिरिरिने भाग घेऊन यशस्वी केलेला दुसरा उपक्रम म्हणजे जागतिक मराठी परिषदेची स्थापना आणि तिची पहिली दोन अधिवेशने. अशा परिषदेची कल्पना जुलै १९८५ मध्ये न्यूजर्सीत झालेल्या अमेरिकेतील मराठी भाषिकांच्या दुसऱ्या परिषदेत शिवसेना नेते श्री.मनोहर जोशी यांनी प्रथम मांडली. ह्या परिषदेस श्री. शरद पवारही उपस्थित होते. पुढे फेब्रुवारी १९८९ मध्ये पवार यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी यासंदर्भात एक बैठक बोलावली. तिला अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित होती. ह्या बैठकीत ‘जागतिक मराठी परिषद’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला
माधवरावांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या ३२-३३ भरते. त्यातील अनेक त्यांच्या गोव्यातील, महाराष्ट्रातील आणि विविध देशातील भ्रमंतीतून निर्माण झाली ; त्यांचा उल्लेख वर आलाच आहे. त्याशिवाय त्यांनी लिहिलेले ‘प्रतिभासम्राट’ हे राम गणेश गडकरी यांचे चरित्र, त्याचप्रमाणे ‘कुसुमाग्रज – गौरव’, ‘साहित्यातील हिरे आणि मोती ‘,’संयुक्त महाराष्ट्राचे महारथी’, ‘चिरंतनाचे प्रवासी’, ‘गाजलेले अग्रलेख’, ‘चौफेर’ चे सहा खंड, ‘दृष्टीक्षेप’ चे चार खंड, यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे.
‘संपादक हा चेहेऱ्याने नव्हे तर लेखणीने ओळखला गेला पाहिजे’, ही पारंपारिक विचारसरणी झुगारून देऊन संपादक त्याच्या लेखणीने तर ओळखला गेलाच पाहिजे, शिवाय या लेखणीमागील हाताने आणि तो हात ज्या चेहेऱ्याचा आहे त्या चेहेऱ्याने ओळखला गेला पाहिजे, अशी नवी विचारसरणी आत्मसात करून आणि आयुष्यभर तिच्याशी पूर्ण इमान राखून ज्या गडकरींनी पत्रकारितेचा धर्म पाळला ते गडकरी केवळ एक पत्रकार, संपादक, लेखक वा सामाजिक कार्यकर्तेच नव्हे तर ज्याला इंग्रजीत ‘गडकरी स्कूल ऑफ जर्नालिझम म्हणता येईल त्या पाठशाळेचे कुलपतीही होते.
२००६: पद्मश्री पुरस्कार सन्मानित लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर, १९२८)
घटना :
१८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
१९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.
१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.
१९४८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव: एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतूकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारा खासगी व्यावसायिकांद्वारे सुरु झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस जून १, इ.स. १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.
१९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
१९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
- मृत्यू :
- १८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल, १७८१)
- १९३४: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २९ जून, १८७१)
- १९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च, १८६७)
१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता पुरस्कारांचे मानकरी नाना पळशीकर यांचे निधन. - १९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन. (जन्म: ७ जून, १९१४)
- २०००: एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.
- २०१४ : जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचे निधन (जन्म : २३ जुलै, १९२७)
जन्म :
१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी, १९२३)
१८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट, १९४७)
१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेत्री पद्म श्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे, १९८१)
१९७०: चार फिल्मफेयर पुरस्कारांचे मानकरी हिंदी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांचा जन्म.