विठ्ठल कारखान्याच्या वसुलीसाठी माजी अध्यक्ष, संचालकांना नोटिसा

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत सुमारे १२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालकांसह सुमारे चारशे जणांना कारखान्याने नुकत्याच नोटिसा पाठवल्या आहेत.
थकबाकी वसुलीचा एक भाग म्हणून कारखान्याने थकबाकी वसूलीची मोहिम हाती घेतली आहे. मागील अनेक वर्षांपासून थकबाकीदार असलेल्या माजी अध्यक्षांसह संचालकांना थकबाकी भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. थकबाकी न भरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ही कारखान्याने सुरू केल्याची माहिती नूतन संचालक अभिजीत पाटील यांनी दिली.
सध्या कारखान्यानं माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सुळे यांच्यासह माजी संचालकांना नाेटीसा पाठविल्या आहेत.