शासकीय वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रवेशाची संधी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शेवगाव येथे संत भगवानबाबा ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १०० व मुलींसाठी १०० अशी स्वतंत्र निवासी व्यवस्था उपलब्ध आहे. इयत्ता पाचवीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन तसेच इतर शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

प्रवेशासाठी अर्ज करणारा विद्यार्थी ऊसतोड कामगाराचा पाल्य असणे आवश्यक असून त्यासाठी संबंधित ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थी शेवगाव शहरातील शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेशित असणे आवश्यक आहे.

अर्ज करताना ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, आयुर्वेद कॉलेजजवळ, शेवगाव येथे संपर्क साधावा.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »