भीमाशंकर शुगर मिल्समध्ये विविध पदांसाठी भरती

धाराशिव : पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव येथील भीमाशंकर शुगर मिल्स प्रा. लि. येथे विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २५०० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.
यामध्ये इंजिनिअरिंग विभागातील असिस्टंट इंजिनिअर, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, डिस्टिलरी इंजिनिअर, प्रोडक्शन इंजिनिअर, बॉयलर सेकंड इन्चार्ज, बॉयलर फर्स्ट क्लास, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, व्हीसीबी ऑपरेटर आदी पदांचा समावेश आहे.
तसेच ऊसतोड व शेती विभागात मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, लॅब केमिस्ट, ज्युनिअर सुपरवायझर, केमिकल मेट, इलेक्ट्रिकल मेट, ऑईलर मेट, वेल्डर ऑपरेटर आणि मेंटेनन्स मशीन ऑपरेटर या पदांसाठीही उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि साखर कारखाना क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष कारखाना साईटवर दि. ३०/०८/२०२६ रोजी सकाळी ८.३० ते ५.३० या वेळेत उपस्थित राहावे.
पत्ता : भिमाशंकर शुगर मिल्स प्रा. ली. पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव.



