ट्वेंटीवन शुगर्समध्ये करिअरची सुवर्णसंधी!
लातूर: मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स लि. मध्ये कुशल मुला-मुलींसाठी नवीन करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी कारखाना प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. कारखान्याच्या मालकीचे ऊस तोडणी मशीन (हार्वेस्टर) व इन्फिल्डर या पदासाठी कंत्राटी पद्धतीने त्वरित जागा भरावयाच्या आहेत. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज hr@21.work ईमेलवर पाठवावे अथवा कारखाना कार्यालय तसेच एमआयडीसी बी-४४ शहर कार्यालयात प्रत्यक्ष सादर करण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना हार्वेस्टर आणि इनफिल्डर चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच १२ महिने काम प्रोत्साहन योजना देखील लागू केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पदांचा तपशील :
अ. क्र. | पदांचे नाव | पदसंख्या | पात्रता |
१ | ऊस तोडणी मशीन (हार्वेस्टर) ऑपरेटर/चालक (कंत्राटी पद्धतीने) | 100 | हार्वेस्टर मशीन चालविण्याचा एक वर्षाचा अनुभव |
२ | इनफिल्डर / ट्रॅक्टर चालक (कंत्राटी पद्धतीने) | 200 | इनफिल्डर / ट्रॅक्टर चालविण्याचा एक वर्षाचा अनुभव |