Category पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील ऊस दर जाहीर करण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत

सांगली :  कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी ( दि. ७) जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, यावर काहीच तोडगा निघाला नाही. अखेर ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना ५…

इथेनॉल धोरणातील अनिश्चितता, साखर उद्योगाला अडचणींच्या खाईत ढकलणार!

Article on Ethanol by Rajendra Jagtap, Baramati

भारताच्या ऊसावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, तसेच आयातीत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणारे केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण (Ethanol Blending Policy) ही संकल्पना निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अस्थिरता, बदलते निर्णय आणि प्रशासनिक विलंब यांनी या उपक्रमाला…

आजरा कारखान्याची वाहने स्वाभिमानी संघटनेने रोखली

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने गतवर्षीची थकीत एफआरपी त्वरित शेतकऱ्यांन देण्यात यावी आणि चालू गाळप हंगामाच्या उसाची पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजरा टोल नाक्याजवळ कारखान्यांची वाहने अडवून वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकला ऊस

CM Agitation

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले असता, त्यांच्या ताफ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी ऊस फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या  ताफ्यावर शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यावेळी ऊस दरावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच एक कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने  ऊस दराचा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा रक्षकांसह सर्वांची पळापळ झाली. यावेळी त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शून्य टक्के *मिल बंद तास* संकल्पना राबवा : आहेर

WR Aher Newasa,

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील,…

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

जयसिंगपूर : राज्यात आगामी गाळप हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अनेक साखर कारखान्ऱ्यांनी अद्याप ऊस दराचा तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करीत आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलक संतप्त होताना दिसत आहेत.…

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून बीडमधील नऊ ऊसतोड मजूर जखमी

सांगली :  ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने तो एका मोटारीस धडकून उलटला. या अपघातात बीड जिल्ह्यातील नऊ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी सकाळी ११ च्या…

ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने समडोळीतील एका वाहतूकदाराची तब्बल ८.४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकुश मधुकर गेजगे (वय ३५) आणि दिलीप मधुकर गेजगे (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊसाहेब…

‘FOI’ चा कृषी संशोधकांच्या आंदोलनाला पाठींबा

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या फेलोशिप, शिष्यवृत्ती वगैरे च्या मागण्यांसाठी कृषी संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या गुडलक चौकात, भर पावसात, आठ दिवस आंदोलन केलं होते. त्याला उपस्थित राहून आम्ही पाठिंबा दिला, अशी माहिती…

कृष्णा कारखान्यात विभाग प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर

Krishna Sugar Training

कराड :  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. जयवंतराव भोसले…

Select Language »