वारी आषाढीची

सावळ्या हरीसाठी |गंध टिळा लावीन||रोज पायी चालेन|मी वारीला जाईन||१|| माझ्या विठूचा विठूचा|गजर हरिनामाचा||ज्ञानोबा तुकारामांचा||झेंडा रोवीन प्रेमाचा|| २|| ठेवी कर कटीवरी|राही उभा विटेवरी||झाली युगे अठ्ठावीस|देवा पुंडलिका द्वारी||३|| चंद्रभागेत स्नान |पुंडलिका भेटेन||नामदेव पायरी|आनंदाने पुजिन||४|| मग दर्शन सोहळा|विठू माझा सावळा||तुळशीहार गळा|माथी कस्तुरीचा टिळा ||५||…