उस वाहतूक व्यवस्थेत गैरव्यवहार; वाहतूकदार एकवटले

बीड : साईप्रसाद शुगर या कारखान्याच्या वाहतूक व्यवस्थापनात उस वाहतूकदार आणि केव्हेंडर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूकदारांच्या कमिशनच्या नावाखाली साईबाबा मंदिर उभारणीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कारखान्याच्या या हंगामातील उस वाहतूक आणि केव्हेंडर व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी असल्याचे समोर आले आहे. चालू २०२५–२०२६ हंगामात जवळपास २०० वाहतूकदारांनी कारखान्याला उस पुरवठा केला. गाळप हंगाम संपल्यानंतर अंतिम देयक हाती येताच केव्हेंडरांकडून मोठ्या प्रमाणात कपात झाल्याचे स्पष्ट झाले.
ही कपात तात्काळ थांबवून संबंधित रक्कम परत करावी, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे. आमची सहमती नसताना आमच्या हक्काच्या पैशांवर डल्ला टाकण्यात आल्याचा आरोप करत, कारखान्यावर विश्वासघात केल्याची तीव्र प्रतिक्रिया पीडित वाहतूकदार व ठेकेदारांनी व्यक्त केली आहे.






