शास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सुप्रभात

आज शनिवार, जानेवारी २८, २०२३ रोजीचे

पंचांग आणि दिनविशेष

युगाब्द : ५१२४

भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर माघ ०८, शके १९४४
०७:१४ : सूर्यास्त १८:२९ : चंद्रोदय
११:५८ : चंद्रास्त ०१:०२, जानेवारी २९
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – ०८:४३ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – १९:०६ पर्यंत
योग : साध्य – ११:५५ पर्यंत
करण : वणिज – ०८:४३ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २०:४८ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १०:०३ ते ११:२७
गुलिक काल : ०७:१४ ते ०८:३८
यमगण्ड : १४:१६ ते १५:४०
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१४
दुर्मुहूर्त : ०७:१४ ते ०७:५९
दुर्मुहूर्त : ०७:५९ ते ०८:४४
अमृत काल : ११:४५ ते १३:२३
वर्ज्य : १५:०१ ते १६:३९
वर्ज्य : ०५:१२, जानेवारी २९ ते ०६:५३, जानेवारी २९

।।एषः ब्रह्मा च विष्णुश्च रुद्रैषाहि च भास्करः।
त्रिदेवात्मा त्रिमूर्त्यात्मा सर्वदेवमयो रविः।।

आज रथसप्तमी.
: माघ शु. सप्तमीला केले जाणारे हिंदूंचे एक सौर व्रत. ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभतिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. शिवाय, मन्वंतराच्या प्रारंभी याच तिथीला सूर्याला रथ प्राप्त झाल्यामुळे हिला रथसप्तमी म्हणतात, अशी समजूत आहे. रथ म्हणजे रथस्थ सूर्य, असा अर्थ येथे अभिप्रेत असण्याची शक्यता आहे. कारण, रथ या शब्दाचा ‘वीर’ वा ‘योद्धा’ असाही अर्थ होतो.

सूर्योपासनेमध्ये रथ ह्या संज्ञेला महत्त्वाचे स्थान आहे, एवढे मात्र नक्की. रथस्थ सूर्याचे चित्र काढणे, रथाची पूजा व दान करणे इ. व्रताचरणांवरून हे स्पष्ट होते. दक्षिणायनात रथहीन झालेला सूर्य उत्तरायणात रथस्थ होतो, अशी समजूत दिसते. शिवाय, सूर्यबिंबाचे रथचक्राशी साम्य असल्यामुळेच सूर्याचा रथ एकचाकी असल्याची पुराणकथा तयार झाली आहे.

या पुराणकथेतून सूर्य व रथ यांचे तादात्म्य सूचित होते. तसेच, रथ वा रथाचे चाक हे सूर्याचे प्रतीक असल्याचेही सूचित होते. रथसप्तमीची भानुसप्तमी, भास्करसप्तमी, रथांकसप्तमी व रथांगसप्तमी ही नावे हेच दर्शवितात. भारतात सर्वत्र या व्रतानिमित्त सूर्योपासना केली जाते परंतु वेगवेगळ्या प्रांतांत व्रताचे नाव व व्रताचरणाचा तपशील या बाबतींत फरक पडतो.

अचला, जयंती, माकरी, माघ, महा इ. नावांनी ही सप्तमी ओळखली जाते. ती रविवारी येत असेल तर विजया आणि त्या तिथीला सूर्याचे संक्रमण येत असेल तर महाजया म्हटली जाते

आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो.” – पंजाब केसरी – लाला लजपत राय
१८६५ : स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)

शास्त्रज्ञ डॉ राजा रामण्णा-
यांचा जन्म म्हैसूर येथे आणि प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठाची बी. एस्सी. व लंडन विद्यापीठाची पीएच्.डी या पदव्या मिळविल्या. १९४९ साली ते टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे रुजू झाले. १९५३ साली ते भाभा अणुसंशोधन केंद्र (पूर्वीचे अणुऊर्जा आस्थापना) येथे अणुकेंद्रीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. जून १९७२ पासून जून १९७८ पर्यंत ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य होते.

जुलै १९७८ मध्ये ते केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव झाले. जानेवारी १९८१ मध्ये ते पुन्हा भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य झाले.

सप्टेंबर १९८३ – फेब्रुवारी १९८७ या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. रामण्णा यांचे संशोधन कार्य अणुकेंद्रीय विक्रिया व न्यूट्रॉन ऊष्मीकरण आविष्कार, विशेषतः स्पंदित न्यूट्रॉन तंत्राचा विकास या विषयांत आहे. त्यांनी अणुकेंद्रीय भंजन (अणुकेंद्राचे तुकडे होण्याविषयीच्या) भौतिकीचा विविध दृष्टिकोनांतून अभ्यास केला आणि एका नवीन भंजन सिद्धांताचे प्रतिपादन केले.

अप्सरा, सायरस व पूर्णिमा या संशोधन विक्रियकांचा, कलकत्ता येथील चल ऊर्जा सायस्लोट्रॉन या ⇨ कणवेगवर्धकाचा तसेच कल्पकम येथील शीघ्र प्रजनक चाचणी विक्रियकाचा [ ⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] आराखडा तयार करणे, प्रतिष्ठापना करणे व कार्यान्वित करणे या सर्व बाबतींत रामण्णा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

१९७४ साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते. अणुऊर्जेचे शांततामय उपयोग या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केले.

१९६१ साली ते नॉर्वे देशाच्या ‘नोरा’ या नवीन अणुकेंद्रीय विक्रियाकाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. १९८६ साली ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएन्ना येथे झालेल्या तिसाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष होते.

रामण्णा इंडियन फिजिक्स ॲसोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिकी विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे अध्यक्ष (१९७६) व इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे उपाध्यक्ष होते.
त्यांना पद्मश्री (१९६८), पद्मभूषण (१९७३) व पद्मविभूषण (१९७५) हे किताब तसेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६३), मध्यप्रदेश सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८३), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे मेघनाद साहा पदक (१९८४), ओम प्रकाश भसीन पुरस्कार (१९८५), इंडियन फिजिक्स ॲसोसिएशनचा आर्. डी. बिर्ला पुरस्कार (१९८५) आणि अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या हे बहुमान मिळाले. रामण्णा यांना संगीताची आवड असून ते उत्तम पियानोवादक होते तसेच त्यांना रॉयल स्कूल ऑफ म्यूझिकचे प्रमाणपत्र मिळालेले आहे.
१९२५: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर, २००४)

‘ऱ्हिदम किंग’- ओ. पी. नय्यर
हे चित्रसंगीतातील आद्य ‘फ्युजनिस्ट’ म्हणून उदयास आले. फ्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटांचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेशालिटी ठरून गेली. त्यांनी १९५२ ते २००७ या काळात एकूण ८०हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.

तेलुगू भाषेतील ‘निराजनम’ या चित्रपटाच्या संगीताने रेकॉर्ड विक्रीचा उच्चांक केला. मींड, तान, आंदोलन हे हरकतीचे प्रकार सढळपणे वापरणारे संगीतकार म्हणजे ओ. पी. नय्यरच. मुख्य म्हणजे असे गीत नृत्यगीत असायला पाहिजे असे नाही.
कवाली, युगलगीत अशा प्रकारच्या गीतांतही हरकतींचा भरपूर वापर आढळतो. नय्यर यांची खासीयत दिसते ती कश्मीर की कली, मेरे सनम, एक मुसाफिर एक हसीना, फिर वही दिल लाया हूँ, हमसाया, कही दिन कही रात, द किलर्स, हम सब चोर है, सीआयडी ९०९, सावन की घटा व प्राण जाय पर वचन न जाय या चित्रपटांतून.
• २००७: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी, १९२६)

घटना
१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
१९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

• मृत्यू
• १६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: २४ सप्टेंबर, १५५१)
• १८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी, १७७५)
• १९८४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर, १८९७)
• १९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. (जन्म: २७ जुलै, १९११)

जन्म :
१८९५ : शंकरराव देव म्हणून प्रसिद्ध असलेले शंकर श्रीकृष्ण देव महाराष्ट्रातील एक काँग्रेस कार्यकर्ते,सर्वोदयी नेते यांचा जन्म (मृत्यू: ३० डिसेंबर, १९७४)
१८९९: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १५ मे, १९९३)
१९३०: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक संगीतमार्तंड , पद्मविभूषण पं. जसराज यांचा जन्म. (मृत्यू:१७ ऑगस्ट २०२०)
१९३७: चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.

आपला दिवस मंगलमय जावो

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »