साखर–इथेनॉल धोरणातील विसंगतींवर डॉ. अमोल कोल्हेंची टीका

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देताना उसापासून आणि मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमध्ये अंतर्गत व्यावसायिक स्पर्धा निर्माण होत आहे. सरकारच्या धोरणातील या विसंगतीमुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी साखर, इथेनॉल आणि शेतीमालाची आयात–निर्यात, शेतीविषयक प्रश्न, स्थानिक विकास तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार करारांच्या मुद्द्यांवरून केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळवून देणे हाच कारखान्यासाठी महत्त्वाचा सन्मान असल्याचे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या विचारांची आठवण करून दिली. नव्या पिढीची ऊर्जा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचा प्रदीर्घ अनुभव यांच्या समन्वयातून कारखान्याचा विकास होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इथेनॉल मिश्रणाबाबत स्पष्टतेची मागणी

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे धोरण स्वागतार्ह असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. मात्र, उसापासून आणि मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमधील स्पर्धेचा फटका ऊस उत्पादकांना बसत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तसेच, २०२३ पूर्वीच्या जुन्या वाहनांवर या इंधनाचा काय परिणाम होणार, याबाबत वाहनधारकांमध्ये चिंता असून सरकारने अधिक स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »