सोलापुरातील साखर उद्योजकांसाठी खुशखबर!

साखरेचा माल देशाच्या विविध भागांत रेल्वेने पाठवता येणार
सोलापूर : सोलापूर हा राज्यातील अग्रगण्य साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन घेतले जाते. या धोरणात्मक विकासामुळे येथील रेल्वे स्टेशनच्या १५ ते २० किलोमीटर परिसरातील कार्यरत असलेल्या अनेक साखर कारखान्यांना त्यांचा साखरेचा माल देशाच्या विविध भागांत कार्यक्षमतेने पोहोचवता येणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील उद्योजकांना होणार आहे.
भविष्यात तिलाटी रेल्वे स्टेशन येथील मालवाहतुकीच्या गुइस शेडमधून आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांत माल पाठवता येणार आहे. सोलापूर रेल्वे विभागाच्या सहकार्याने साखर पाठविणे शक्य झाले आहे. सोलापूर विभाग व्यापाऱ्यांना विशेषतः साखर कारखान्यांना त्यांच्या मालाची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित व्हावी यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, सोलापूर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने तिलाठी रेल्वे स्टेशनवरील गुड शेड येथून एप्रिल आणि मे २०२५ मध्ये, प्रत्येकी साखरेच्या दोन रॅकमधून ५३६० मॅट्रिक टन दक्षिण रेल्वेच्या तामिळनाडूतील नेल्लीकुप्पम येथे पाठविले. त्यातून सोलापूर विभागाला ७०.४ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.