राज कपूर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, जून २, २०२५ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ १२, शके १९४७
सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : २३:५१ चंद्रास्त : १२:४४ (जून ३)
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – २०:३४ पर्यंत
नक्षत्र : मघा – २२:५५ पर्यंत
योग : व्याघात – ८:२१ पर्यंत, नंतर हर्षन.
करण : गरज – ०८:११ पर्यंत.
द्वितीय करण : वणिज – २०:३४ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : ०७:३६ ते ०९:१५
गुलिक काल : १४:१२ ते १५:५०
यमगण्ड : १०:५४ ते १२:३३
अभिजित मुहूर्त : १२:०६ ते १२:५९
दुर्मुहूर्त : १२:५९ ते १३:५२
दुर्मुहूर्त : १५:३७ ते १६:३०
अमृत काल : २०:२३ ते २२:०५
(सर्व वेळा या पुण्याच्या अक्षांश व रेखांशाप्रमाणे आहेत)

आज केशवा समर्पणाचा, प्राणदीप मी तुजला लावीन।
ध्येयभास्करा मीही तुझ्यातीला अंश तुझ्यातच मिसळून जाईन॥

या उक्तीप्रमाणे जीवन संघमय करणारे विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंतराव सहस्रबुद्धे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंतरावांचा जन्म १७ एप्रिल १९६६ रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे वडील संघकार्यकर्ते तर आई राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या. सर्व कुटुंबच संघविचाराने भारलेले. जयंतरावांनी B.Sc.Tech (Eletronics) ही पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. नंतर मुंबईतील भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये (BARCमध्ये) काही काळ संशोधक म्हणून नोकरी केली. परंतु बालपणापासून राष्ट्रसेवेच्या झालेल्या संघसंस्कारांमुळे त्यांनी 1989मध्ये नोकरीचा त्याग केला आणि ते पूर्णवेळ प्रचारक झाले.

नंतरच्या काळात त्यांनी गोवा विभाग प्रचारक म्हणून दायित्व स्वीकारले. २००१ ते २००९ या काळात त्यांच्याकडे कोकण प्रांत प्रचारकाचे दायित्व आले. काही काळ ते सरकार्यवाह हो.वै. शेषाद्रींचे साहाय्यक सचिव होते. शेवटी २००९ पासून ते विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव झाले.
जयंत सहस्रबुद्धे यांनी विज्ञान भारतीचे कार्य जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तरुण वयात असामान्य कार्य करताना, भारतीय विज्ञान आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान या विषयावर विमर्श घडवण्याचे उल्लेखनीय काम त्यांनी केले. विज्ञान भारतीच्या अनेक आयामांना आणि अनेक उपक्रमांना गती आणि मार्गदर्शन देण्याचे काम जयंतजी अखंड करत होते.


विज्ञानभारतीच्या विज्ञानप्रसाराच्या व विज्ञानजागृतीच्या मौलिक कार्यात जयंतरावांचे योगदान अमूल्य असे आहे. विज्ञानभारतीच्या कामाला त्यांनी विविध आयाम जोडले, तसेच भारतीय कला आणि विज्ञान अशा अनेकविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन जयंतरावांच्या मार्गदर्शनाने सुरू झाले.
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची गंगोत्री भारतीय भूमीत उगम पावते. पुरातत्त्वशास्त्र, प्राचीन वाङ्मय आणि ते निर्माण करणारे ॠषितुल्य तत्त्वचिंतक यांचा आधार घेऊन या उगमापासून सुरू झालेल्या प्रवाहाचा मागोवा घेता येतो. विज्ञान विकासाचे मूळ अंतिम सत्याचा वेध घेणार्या चिंतनाच्या बैठकीवर आधारित असल्याचा प्रत्यय अभ्यासकांना येतो. शून्यासारखा गणितीय संकल्पना, आरोग्याचा मूलभूत विचार करणारे आयुर्वेदासारखे ग्रंथ, उत्खननातून हाती आलेले पुरावशेष, अवकाशातील ग्रह, नक्षत्र यांची स्थिती असे अनेक आधार विज्ञान-तंत्रज्ञानाचा उगम आणि पुढच्या विकास-प्रवाहाचा मार्ग निश्चित करण्यासाठी उपयोगी पडतात.

याविषयी सखोल व शास्त्राधारित संशोधन करून मिळणारी माहिती भारतीय समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विज्ञान भारतीची स्थापना झाली. 1991मध्ये स्थापन झालेल्या विज्ञान भारतीचे कार्य राष्ट्रीय पातळीवर विस्तारत गेले. या कार्याला वाहून घेतलेल्या अनेक वैज्ञानिकांची, विज्ञानसंस्थांची, प्राध्यापकांची व तंत्रज्ञांची संख्या वाढत गेली. या प्रसारकार्यात सहयोगी होणार्या कार्यकर्त्यांमध्ये शीर्षस्थान भूषविले ते जयंतराव यांनी. जयंतरावांची कार्यपद्धती, दूरदृष्टी, संघटनकौशल्य, कामाचा झपाटा, लोकसंग्रह अशा अनेक पैलूंचा परिचय कालौघात होत गेला. परंतु अजूनही जयंतराव पूर्णपणे समजले नाहीत, ही खंत कायम आहे. विज्ञान भारतीचे काम देशातील विख्यात वैज्ञानिक संशोधन संस्था आणि शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रात कार्य करणार्या सामाजिक संस्था यांच्यापर्यंत थेट पोहोचविण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष उल्लेखनीय आहे.


विज्ञान भारतीच्या कामाला त्यांनी विविध आयाम जोडले. विद्यार्थी विज्ञान मंथन, टेक फॉर सेवा, इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल, विश्ववेद विज्ञान संमेलन, वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन, ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स फोरम (GIST), नॅशनल आयुर्वेद स्टुडंट्स यूथ असोसिएशन (न्यासा), महिला वैज्ञानिकांचे ‘शाक्ती’ संघटन, पारंपरिक भारतीय कला आणि विज्ञान अशा अनेकविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन जयंतरावांच्या मार्गदर्शनाने सुरू झाले. भारताच्या ३० राज्यांत आणि ७ परदेशांत विज्ञान भारतीचा विस्तार करण्याचे बरेचसे श्रेय जयंतरावांकडे जाते. स्वातंत्र्याचा अमृतकाल या निमित्ताने विज्ञान भारतीने अनेक उपक्रम योजले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भारतीय वैज्ञानिकांचे आणि तंत्रज्ञांचे अज्ञात योगदान प्रकाशात आणण्यासाठी या उपक्रमांचा उपयोग झाला.

या उपक्रमांमध्ये अनेक भारतीय वैज्ञानिकांचे राष्ट्रहितैषी योगदान या विषयावर प्रकट व्याख्याने व प्रदर्शने योजण्यात आली. जयंतरावांनी याविषयी मार्गदर्शन तर केलेच, तसेच अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. लेख लिहिले. भारतीय विज्ञानाचा प्रसार करणार्या ‘सायन्स इंडिया’ या नियतकालिकाचे ते संपादक सल्लागार मंडळाचे प्रमुख सदस्य होते. ‘विज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याची अज्ञात गाथा’ या विविध भाषांतील पुस्तकाचे प्रास्ताविक व एक लेख जयंतरावांनी लिहिला आहे.

या विषयांवर व्याख्याने देणार्या वक्त्यांचे प्रबोधन करण्यावर त्यांचा भर होता. जयंतरावांनी भविष्यकालीन अनेक योजनांचे आणि उपक्रमांचे सूतोवाच केले होते. भारतीयांचा विज्ञानक्षेत्रातील न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढावे, हा त्यांचा प्रमुख दृष्टीकोन होता. विज्ञान भारतीचे हे ध्येय नजीकच्या काळात साध्य व्हावे, यासाठी ते आग्रही होते.
रात्री प्रवास आणि दिवसभर काम या संघप्रचारकांच्या ध्येयवादी जीवनक्रमानुसार जयंतरावही कार्यरत राहिले, परंतु शेवटी नियतीने घाला घातलाच. दुर्दैवाने सप्टेंबर, २०२२ मध्ये जयंतराव रात्रीच्या प्रवासात असताना नोएडा जवळ त्यांच्या वाहनाला झालेल्या जीवघेण्या अपघातामुळे जयंतराव अंथरुणालाच खिळून राहिले.
तेरा वैभव अमर रहे माँ । हम दिन चार रहे ना रहें।।
उक्तीप्रमाणे जयंतरावांनी संपूर्ण आयुष्य मातृ भूमीचे चरणी अर्पण केले.
२०२३ : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत सहस्रबुद्धे यांचे आठ महिने मृत्यूशी झुंज देत दु:खद निधन (जन्म : १७ एप्रिल, १९६६)

जीना यहाँ, मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब हमको आवाज़ दो
हम हैं वहीं, हम थे जहाँ
अपने यही दोनों जहां
इसके सिवा जाना कहाँ ||

ये मेरा गीत जीवन संगीत
कल भी कोई दोहरायेगा
जग को हँसाने बहरूपिया
रूप बदल फिर आयेगा
स्वर्ग यहीं, नर्क यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब…||

कल खेल में, हम हों न हों
गर्दिश में तारे रहेंगे सदा
भूलोगे तुम, भूलेंगे वो
पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहीं, अपने निशाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब… ||

चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर- राज कपूर यांनी वयाच्या ११व्या वर्षी फ़िल्म इंकलाब मध्ये अभिनयाची सुरवात केली. मात्र राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांना आपला मुलगा राज फार प्रगती करेल असा भरवसा नव्हता.बॉम्बे चित्रपटगृहात त्यांनी हेल्परचे काम तसेच सेटवर क्लैपर बॉय चे काम सुद्धा केले.
केदार शर्मा यांनी राज यांना नीलकमल चित्रपटात मधुबाला बरोबर नायकाची भूमिका दिली. वयाच्या २४व्या वर्षी (१९४८ मध्ये) आर. के. फिल्मची स्थापना केली. आग चित्रपट प्रदर्शित करून त्यात यश सुद्धा मिळवले. १९४८ ते १९८८ पर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती करून बॉक्स ऑफिस वर सुपर हिट झालेल्या अनेक चितपटात त्यांनी नायकाची भूमिका केली. नर्गिस बरोबर काम करताना बरसात, आवारा, श्री 420, चोरी चोरी हो जोडी फिल्म इंडस्ट्री मध्ये यशस्वी जोडी मानली गेली. तर १९७० मध्ये प्रदर्शित झालेला महत्वाकांक्षी चित्रपट मेरा नाम जोकर ची निर्मिती त्यांनी ६ वर्षात केली.
प्रेमरोग, मेरा नाम जोकर, संगम, जिस देशमे गंगा बहती है, अनाडी ह्या चित्रपटांना फिल्म फ़ेअर अवॉर्ड्सने सन्मानित केले. भारत सरकारने १९७१ मध्ये पदम भूषण सन्मानाने तर १९८७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले गेले.
१९८८: भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९२४)

घटना :
१८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
१८९६: गुग्लियेमो मार्कोनीला रेडिअोसाठी पेटंट बहाल.
१८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
१९४६: राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
२०२३ : २ जून, २०२३ रोजी ओडिशाच्या बालासोर शहराजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाली. एक मालगाडी तसेच कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा-यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस बहानागा बाजार रेल्वेस्थानकाजवळ आदळल्या. या अपघातात ३०० हुन प्रवासी व्यक्ती मृत्यू पावल्या. यांशिवाय १,१७५ पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाला.

  • मृत्यू :
    १९७५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर, १८८५)
    १९९२ : महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन ((जन्म : २१ एप्रिल १९३४)
    २०१४: भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)

जन्म :
१९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.
१९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.
१९५५: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.
१९५५: चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मणिरत्नम यांचा जन्म.
१९६३: अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर, २०१२)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »