हनुमान जन्मोत्सव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, एप्रिल १२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २२, शके १९४७
सूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:५५
चंद्रोदय : १८:२९ चंद्रास्त०६:२१, एप्रिल १३
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – ०५:५१, एप्रिल १३ पर्यंत
नक्षत्र : हस्त – १८:०८ पर्यंत
योग : व्याघात – २०:४१ पर्यंत
करण : विष्टि – १६:३५ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०५:५१, एप्रिल १३ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : ०९:३१ ते ११:०५
गुलिक काल : ०६:२४ ते ०७:५७
यमगण्ड : १४:१३ ते १५:४७
अभिजित मुहूर्त : १२:१४ ते १३:०४
दुर्मुहूर्त०६:२४ ते ०७:१४
दुर्मुहूर्त : ०७:१४ ते ०८:०४
अमृत काल : ११:२३ ते १३:११
वर्ज्य : ०३:०९, एप्रिल १३ ते ०४:५७, एप्रिल १३

॥ श्रीआंजनेय द्वादशनामस्तोत्रम् ॥
हनुमानंजनासूनुः वायुपुत्रो महाबलः ।
रामेष्टः फल्गुणसखः पिंगाक्षोऽमितविक्रमः ॥ १॥
उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशकः ।
लक्ष्मण प्राणदाताच दशग्रीवस्य दर्पहा ॥ २॥
द्वादशैतानि नामानि कपींद्रस्य महात्मनः ।
स्वापकाले पठेन्नित्यं यात्राकाले विशेषतः ।
तस्यमृत्यु भयंनास्ति सर्वत्र विजयी भवेत् ॥

हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती राया हजर असतो.

रामभक्त हनुमान, दास मारुती, वीर मारुती अशा विविध नावांनी व गुणांनी ओळखली जाणारी देवता शक्ती व बुद्धी दाता अशा हनुमान देवतेचा आज जन्मोत्सव आहे.

छत्रपती शिवरायांच्या संघर्षमय आयुष्यात ते अगदी जिद्दीने लढले. एक कुशल प्रशासक म्हणून आजही त्यांचा आदर्श घेतला जातो. अनेक लढाया, मोहिमा शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने जिंकल्या. तेजस्वी, प्रेरणादायी, आदर्श अशा राजाला पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम! आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांमधील एकतरी गुण अंगिकारुया आणि पुढील पिढीपर्यंत पोहचवूया.

आज छत्रपती शिवाजी महाराज पुण्य तिथी आहे . ( तिथीप्रमाणे )

संग्राम सिंह पहिला – ज्याला सामान्यतः राणा सांगा म्हणून ओळखले जाते , ते १५०८ ते १५२८ पर्यंत मेवाडचा राणा होते. सिसोदिया राजघराण्यातील एक सदस्य, त्याने चित्तोड येथे त्याची राजधानी असलेल्या सध्याच्या राजस्थान , गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागांवर नियंत्रण ठेवले .

त्यांच्या कारकिर्दीचे त्यांच्याअनेक समकालीनांनी कौतुक केले, ज्यात पहिला मुघल सम्राट बाबर देखील होता , ज्यांनी त्याला त्या काळातील “सर्वात महान भारतीय शासक” म्हणून वर्णन केले. मुघल इतिहासकार अब्द अल-कादिर बदायुनी यांनी सांगाला पृथ्वीराज चौहानसह सर्व राजपूतांमध्ये सर्वात धाडसी म्हटले , ज्याला राय पिठौरा म्हणूनही ओळखले जाते .

त्याच्या लष्करी कारकिर्दीत, सांगाने अनेक शेजारच्या सल्तनतांवर अनेक यश मिळवले .

१५१९ मध्ये गॅग्रोनच्या लढाईनंतर , सांगाने माळवा सल्तनतचा बराचसा भाग ताब्यात घेतला आणि त्यावर राज्य करण्यासाठी त्याच्या एका सेवक मेदिनी रायची नियुक्ती केली. त्याने विविध प्रसंगी गुजरातच्या सुलतानालाही नम्र केले . त्याच्या ज्ञात विजयांमध्ये खतोली , धोलपूर आणि रणथंभोर येथे दिल्लीच्या लोदी राजवंशावर झालेले अनेक पराभव समाविष्ट होते .

तराईनच्या दुसऱ्या लढाईनंतर त्याने पहिल्यांदाच अनेक राजपूत शासकांना एकत्र केले आणि मुघल साम्राज्याची स्थापना करणाऱ्या बाबरच्या आक्रमणकारी सैन्याविरुद्ध कूच केले . बायना येथे सुरुवातीच्या यशानंतरही , बाबरने गनपावडर शस्त्रांचा वापर करून सांगाला खानवा येथे मोठा पराभव पत्करावा लागला , जे त्यावेळी उत्तर भारतात अज्ञात होते.

सांगा हा रायमल यांचा तिसरा मुलगा होता. तथापि, परिस्थितीमुळे आणि त्याचे भाऊ पृथ्वीराज आणि जगमल यांच्याशी झालेल्या तीव्र संघर्षानंतर, ज्यामध्ये त्याने आपला एक डोळा गमावला, अखेर १५०९ मध्ये ते मेवाडच्या गादीवर बसले.

१४८४ : मेवाडचे महापराक्रमी राजा संग्राम सिंग ऊर्फ राणासंग यांचा जन्म. ( मृत्युः ३० जानेवारी, १५२८ )

कधी शिवराय यायचे तरी
दिवाळि दसरा मिळुनि सोहळा आता व्हायचा घरी

सडा केशरी शिंपिन दारी

रांगोळी घालीन किनारी
गरिबाचे घर जाइल उजळुन राजमंदिरापरी ||

| छत्रपतींच्या सरदराशी
मराठमोळ्या दिलदाराशी
ठरले माझे लगीन, पडतिल तांदूळ डोईवरी

मिळता आशिर्वाद तयांचा
साक्षात्कारच चैतन्याचा

मीच नव्हे उठतात शिरा या अमृत प्यालापरी

मराठी काव्य जगतात सोलापूरचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले ते प्रथम कुंजविहारी व त्यांच्यानंतर संजीव यांच्यामुळे. ख्यातनाम कवी, गीतकार संजीव (नाव – कृष्ण गंगाधर दीक्षित. )

१९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी१९९५)

  • घटना :
    १६०६: ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
    १९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
    १९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
    १९६९ : समाजातील मटका व जुगार ह्या व्यसनांना प्रतिबंध घालून त्यातून होणारी जण सामान्यांची फसगत टाळण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरु केली.
    १९९७: भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
    १९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
    २००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.

• मृत्यू :
• १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १६६२)
• १९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
• २००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९६२)
• २००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ यांचे निधन.
• २००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९२९)

  • जन्म :

१४८४: मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १५२८)
१८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)
१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)
१९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट१९७८)
१९४३: माजी लोकसभा सभापती , केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.
१९५४: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८९)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »