जागतिक हिंदी दिवस

आज मंगळवार,
जानेवारी १०, २०२३
रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष २१, शके १९४४
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१८
चंद्रोदय : २१:१३ चंद्रास्त : ०९:४०
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : तृतीया – १२:०९ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – ०९:०१ पर्यंत
योग : प्रीति – ११:२० पर्यंत
करण : विष्टि – १२:०९ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०१:२१, जानेवारी ११ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कर्क – ०९:०१ पर्यंत
राहुकाल : १५:३२ ते १६:५५
गुलिक काल : १२:४६ ते १४:०९
यमगण्ड : १०:०० ते ११:२३
अभिजित मुहूर्त : १२:२४ ते १३:०८
दुर्मुहूर्त : ०९:२७ ते १०:११
दुर्मुहूर्त : २३:२८ ते ००:२०, जानेवारी ११
वर्ज्य : २२:२६ ते ००:१३, जानेवारी ११
।।ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश।
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति। मेरे कर दूर क्लेश।।
आज अंगारकी चतुर्थी आहे.
दरवर्षी १० जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदीचा प्रसार करण्यासाठी आणि हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सादर करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे. १० जानेवारी १९७५ रोजी नागपूर येथे प्रथम विश्व हिंदी परिषद आयोजित करण्यात आली, म्हणून हा दिवस ‘जागतिक हिंदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
आज जागतिक हिंदी दिवस’ आहे
काव्यसंग्राहक – संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर गंगाधर केळकर हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असेच. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. ते वास्तव्याला पुण्यातच होते. १९१५ पासून ‘अज्ञातवासी’ या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत. श्री महाराष्ट्र शारदा मंदिर, पुणे या संस्थेचे ते संस्थापक होते. शारदामंदिर तर्फे केळकरांनी महाराष्ट्र शारदा भाग १ या ग्रंथाचे संपादन केले.
परशुरामपंत, तात्यासाहेब गोडबोले, चिपळूणकर, केशवकुमार ते कवी अनिल यांच्यापर्यंत कवींच्या निवडक कविता त्यात समाविष्ट आहेत. भा. रा. तांबे यांची कविता, झेंडूची फुले, ह. स. गोखले यांच्या ‘काहीतरी’ काव्यसंग्रहातील कवितांचेही ते संग्राहक होते. अज्ञातवासींची कविता ‘अज्ञातवास’, ‘अज्ञातवासींची कविता भाग १, भाग २’ या काव्य संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. निसर्ग, प्रेमविषयक, वात्सल्याने भारावलेल्या, जीवनचितनपर, गुढात्मक अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.
संग्रहालय वृद्धीसाठी काकांनी सगळा भारत पालथा घातला. मद्रासमधील रुक्मिणी देवी अरुंडेलपासून पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत अनेकांना भेटले, त्यांना संग्रहालयात आणले. वस्तुसंग्रहाचा त्यांचा ध्यास हा जगातील एक मोठा विक्रम होता. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून जुन्या वस्तू, चित्रं, शिल्पं, मूर्ती, दागदागिने, वाद्यं गोळा करण्याचा घेतलेला ध्यास त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन होईपर्यंत एकांडा शिलेदाराच्या वृत्तीने जपला.
पराकोटीच्या इतिहास प्रेमातून त्यांनी पुराणवस्तुंचा संग्रह जमविला व आपल्या दिवंगत पुत्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘राजा केळकर’ ह्या पुराण वस्तुसंग्रहालायाची निर्मिती केली. यासाठी दिनकर केळकरांनी व त्यांच्या पत्नीनी सतत भ्रमंती करून, आर्थिक झीज सोसून या ऐतिहासिक सुंदर अशा कलावस्तुंचा संग्रह केला. हा पुराण वस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी १९७९ साली राज्यशासनाच्या ताब्यात दिला. हे त्यांचे दातृत्वही असाधारणच होते.
इतिहास क्षेत्रातील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल १९७८ साली पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय ‘डॉक्टरेट’ पदवी घेऊन त्यांचा गौरव केला. अशा या कवी मनाच्या संग्राहकाचे १९९० साली निधन झाले.
१८९६ : वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म.
मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार- मुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनतेवर छाप उमटवणारे मुख्यमंत्री म्हणून मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
घरोघरी वृत्तपत्र विकण्याचे कामापासून स्टेशनवर तिकीट तपासनीस काम केले. चंद्रपूर सारख्या अति दुर्गम भागातून एक सामान्य माणूस परिश्रमाने, इच्छा शक्तीचे तसेच कठोर परिश्रमाचे बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारू शकतो हे नक्कीच प्रेरणादायी आहे. मारोतराव हे समाजातील तळाच्या वर्गातून स्वकर्तृत्वाने पुढे आलेले, मोठे झालेले नेतृत्व होते. ते केवळ देशभक्तच नव्हे तर धुरंदर राजकारणी, हाडाचे पत्रकार, प्रतिभावंत साहित्यिक , उत्तम खेळाडू व प्रभावी वक्ते होते.
आपल्या कारकिर्दीत अत्यंत संरक्षण खात्याचे महत्वाचे प्रकल्प त्यांनी महाराष्ट्रात उभे केले. ओझरचा मिग विमान कारखाना हा एक त्यापैकी आहे. तसेच वरणगाव , भंडारा व भद्रवती येथील संरक्षण उत्पादनाशी निगडित कारखाने त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आले. दूरदृष्टीने उभा केलेला वाशी खाडी पूल ही सुद्धा त्यांचीच कल्पना व स्वप्नपूर्ती होय.
चिनी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले वातावरण राष्ट्रीय प्रवृत्तीने भारून टाकण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्याकाळी संरक्षण खात्याची आर्थिक गरज घेऊन तब्बल ८ कोटी रक्कम जमा केली. एकूणच त्यांची कारकीर्द राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवून गेली.
१९००: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर, १९६३)
घटना :
१६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
१८१०: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
१८६३: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
१८७०: मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
१८७०: जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.
१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
१९७२: पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
मृत्यू:
• १७६०: मरण्याच्या आगोदर नजीबने त्यांना विचारले होते ‘क्यूॅ पाटील लढोगे?’ त्यावर दत्ताजीने दिलेले ‘क्यूॅं नही, बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर करणारे पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.
• १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.
• २००२: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर, १९२४)
जन्म :
१८९६ : राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म ( मृत्यू : १२ जानेवारी, १९६६ )
१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म. ( मृत्यू : ५ जून, १९८५)
१९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म. ( मृत्यू : २१ जुलै, २००१ )
१९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.
१९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म