ताश्कंद करार

आज बुधवार, जानेवारी ११, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष २२, शके १९४४
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त १८:१८
चंद्रोदय : २२:०२चंद्रास्त : १०:१६
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – १४:३१ पर्यंत
नक्षत्र : मघा – ११:५० पर्यंत
योग : आयुष्मान् – १२:०२ पर्यंत
करण : बालव – १४:३१ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०३:३६, जानेवारी १२ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : १२:४६ ते १४:०९
गुलिक काल : ११:२३ ते १२:४६
यमगण्ड : ०८:३७ ते १०:००
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२४ ते १३:०८
अमृत काल : ०९:०९ ते १०:५७
वर्ज्य : २०:४२ ते २२:२८
|| जय जवान | जय किसान ||
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.
सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला. अर्थात त्यांचे निधन हे संशयास्पदच मानले जाते
१९६६: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)
संशोधक, व्यासंगी, विश्लेषक, निःस्पृह डॉ. य. दि. फडके –

कठीण आर्थिक स्थिती असल्यामुळे लहानपणी दारिद्य्राचे चटके सहन करावे लागले. त्यामुळे अतिशय धडपड करून फडक्यांना शिक्षण घ्यावे लागले. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सोलापूर येथेच घेतले. शालेय शिक्षण घेत असतानाच य.दि. फडके यांनी द्वा.भ. कर्णिक यांच्या ‘संग्राम’ या वृत्तपत्रात लेखन सुरू केले होते. १९४७ साली मॅट्रिक, १९५१ साली बी.ए. (राज्यशास्त्र विषय घेऊन) आणि १९५३ साली राज्यशास्त्र विषय घेऊन ते एम.ए .झाले. तल्लख बुद्धी असल्याने त्यांना शासकीय महाविद्यालयात अध्यापनाची संधी मिळाली.
अभ्यासाचा-व्यासंगाचा विषय राज्यशास्त्र हा असल्याने फडक्यांना अवती-भवतीच्या राजकीय स्थिति-गती, घटनांचे बारकाईने अवलोकन व चिंतन करण्याची सवय लागली. महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापन करताना ह्या स्थितिगती-घटनांचे ते सूक्ष्म विश्लेषण करीत असत. हे विश्लेषण करताना वस्तुस्थिती, पुरावे ह्यांचा भक्कम आधार ते घेत असत.
जोडीला भेदक, तिखट पण नेमकी वक्तृत्वशैली त्यांना लाभलेली असल्याने सर्व विश्लेषण सर्जक होत असे.
त्यांचा महाविद्यालयातील अध्यापनाचा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या ऐन आंदोलनाचा होता. त्यामुळे त्यांचे अवघे लक्ष ह्या आंदोलनाचा बारकाईने अभ्यास करण्याकडे लागले होते. तोच त्यांच्या प्रबंधाचा विषय झाला. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष’ ह्या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी १९७३ साली मिळवली.
मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात, प्रथम अधिव्याख्याता नंतर प्रपाठक (रीडर) म्हणून; पुढे पुणे विद्यापीठात ‘महात्मा गांधी अध्यासनाचे’ प्राध्यापक म्हणून; नंतर मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ ह्या संस्थेत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. जवळपास पस्तीस वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला काही फक्त राजकीयच अंग नव्हते- ते तर होतेच पण त्याशिवाय त्या चळवळीला सामाजिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिमिती होत्या.
महाराष्ट्राच्या अवघ्या जीवनाच्या धमन्यांतूनच ही चळवळ वाहत होती. फडक्यांनी प्रबंधलेखन करताना ह्या सर्व परिमितींचा धांडोळा सूक्ष्मपणे घेतला आहे. त्यांचा प्रबंध हा सर्जनशीलतेचा वस्तुपाठच झाला आहे.
चरित्रकार आणि इतिहासकार अशा दोन अंगांनी फडके प्रसिद्ध होते. ‘शोध बाळगोपाळांचा’(१९७७), ‘केशवराव जेधे’ (१९८२), ‘अण्णासाहेब लठ्ठे’(१९९०), ‘कहाणी सुभाषचंद्रांची’ (१९८६) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. वस्तुनिष्ठ, आणि निःपक्षपाती, स्पष्ट, परखड असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप असे.
त्याबरोबरच ते निर्भीड असे. स्वा.सावरकर, सेनापती बापट, बाबाराव सावरकर ह्यांची देशभक्ती आणि त्याग ह्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्यासंबंधीचे लेखन त्यांनी केले. त्यांनी लिहिलेले ‘आगरकर’ हे चरित्र उत्कृष्ट चरित्राचा आदर्श आहे.
त्यांनी केलेले ललितलेखनही लक्षणीय आहे. ‘दृष्टादृष्ट’(१९९२), ‘शोधता शोधता’ (१९९५), ‘व्यक्तिरेखा’ (१९९८), ‘नाही चिरा, नाही पणती’ (२०००), ‘स्मरणरेखा’ (१९९८) ही त्यांची ललित पुस्तके प्रसिद्ध आहेत.
• २००८: मराठी लेखक यशवंत दिनकर तथा डॉ. य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३१)
घटना:
१७८७: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.
१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.
१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
१९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
२०२१ : ‘कॉकपिटमध्ये प्रोफेशनल, योग्य आणि आत्मविश्वास असलेल्या महिला चालक सदस्यांनी एअर इंडियाच्या विमानाने सॅन फ्रान्सिस्को येथून उत्तर ध्रुवावरून प्रवास करीत बेंगळुरूसाठी उड्डाण केले. भारताच्या नारीशक्तीने ही प्रथम कामगिरी करत इतिहास रचला आहे.
• मृत्यू:
• १९९७: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
जन्म :
१८५८: हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)
१८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ०२ सप्टेंबर १९७६)
१९४४: झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.
१९५४: हिंदी चित्रपट दिगदर्शक बोनी कपूर यांचा जन्म.
१९५५: उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.
१९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.
– वासुदेव डोंगरे