अखेर बिबट्या उसाच्या शेतात जेरबंद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे उसाच्या शेताजवळ लावलेल्या एका पिंजऱ्यात अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट्याला बुधवारी पहाटेच्या सुमारास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सदर बिबट्याची माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली. गेल्या महिन्याभरापासून बेल्हे परिसरात या बिबट्याने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते.

 गोठ्यात बांधलेल्या अनेक पाळीव प्राण्यांवर या बिबट्याने हल्ले केले होते. परिसरात सर्वत्र याचा वावर असल्याने विद्यार्थीही शाळेत येण्यास घाबरत होते. ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. अखेर त्यात बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सदर बिबट्याची माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी केल्याने ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »