लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने १०० रु.चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मांजरा, रेणा, जागृति, विलास १, विलास २, मारुती महाराज, मांजरा शुगर्स चां समावेश

लातूर – राज्यात नावलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील सर्व कारखान्यानी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त उस उत्पादक शेतकरी सभासद यांना ऊसदरा पोटी ₹ १००/- चा हप्ता खात्यावर वर्ग केला असून, परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना, विलास साखर युनिट १, युनिट २, जागृती शुगर तळेगाव, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना, मांजरा शुगर्स मंगरूळ या साखर कारखान्याचा समावेश आहे

यापूर्वी या सर्व साखर कारखान्याकडून ₹ २७५०/- रुपये प्रति टन देण्यात आले असून एकूण ₹ २८५०/- उर्वरित रक्कम लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांना शेतीतील उन्हाळी कामे व ऊस पीक खतासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने शेतकऱ्यांचा खात्यावर १०० रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला असून ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या बँकेतून रक्कम घ्यावी, असे आवाहन मांजरा परिवाराच्या वतीने कऱण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »