ऑपरेशन ब्लू स्टार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, जून ३, २०२५ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ १२, शके १९४७
सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : १२:४२ चंद्रास्त : ०१:१७ (जून ४)
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – २१:५६ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाफल्गुनी – १२:५८ पर्यंत (जून ४ पर्यंत)
योग : हर्षण – ०८:०९ पर्यंत
करण : विष्टि – ०९:१० पर्यंत
द्वितीय करण : बव – २१:५६ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : १५:५१ ते १७:३०
गुलिक काल : १२:३३ ते १४:१२
यमगण्ड : ०९:१५ ते १०:५४
अभिजित मुहूर्त : १२:०६ ते १२:५९
दुर्मुहूर्त : ०८:३६ ते ०९:२८
अमृत काल : १८:०२ ते १९:४६
(सर्व वेळा या पुण्याच्या अक्षांश व रेखांशाप्रमाणे आहेत)

आज जागतिक सायकल दिन आहे

ऑपरेशन ब्लू स्टार : हे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान खलिस्तान दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे. अमृतसरमधील सुवर्णमंदीरात अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी यातुन कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला.


पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे पर्यावसान पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले.
अखेरीस ऑपरेशन ब्लू स्टार चा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले.

जर्नेल सिंह भिंद्रनवाले सह बरेच दहशतवादी यात मारले गेले, इतरांनी शरणागती पत्करली. पण सुवर्णमंदीरात त्यावेळी बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमंदीरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली. हिंसाचाराची मालिका येथेच न संपता याचीच परिणिती पुढे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानंतर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले.


तसेच ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईचे वेळी १३ वे भूदल प्रमुख असणारे जनरल अरुण श्रीधर वैद्य यांची सेवेतून निवृत्त झाल्यावर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची (१० ऑगस्ट १९८६) महाराष्ट्रात पुणे येथे ह्त्या केली.

१९६६ मध्ये शीख बहुल असणारा पंजाब राज्य रचना झाली. पण त्यानंतरही पंजाबच्या राजकारणात पकड कायम ठेवण्यासाठी अकाली दलाकडुन आक्रमक राजकारण चालु राहिले. चंडिगड पंजाब मधील सामिल करावे. पंजाबमधुन जाणाऱ्या नद्यांवरील पाणी हरियाणा व राजस्थान ला देणे यावरुनही विवाद होता. हळुह़ळु याचे रुपांतरण फुटीरतावादी चळवळीत झाले. पंजाबच्या राजकारणात फुट पाडण्यासाठी काँग्रेस ने जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना छुपा पाठिंबा दिला. याची कबुली काँग्रेसने २०११ साली आपल्या पक्षाचा जो अधि़कृत इतिहास प्रकाशित केला त्यात दिली. पण त्याची जबाबदारी ही दिवंगत नेते व इंदिरा गांधींचे जेष्ठ पुत्र संजय गांधी यांच्यावर टाकली.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिर ताब्यात घेतले.

कामगारांसाठी देश ढवळून काढणारा नेता म्हणून ओळख असणारे त्या जॉर्ज फर्नांडिस. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आई-वडिलांनी त्यांना रोमन कॅथलिक धर्मगुरु होण्यासाठीचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. मात्र, अन्यायग्रस्तांबद्दल मनात आपुलकी असणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांनी वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधली. सार्वजनिक जीवनातील ही त्यांची पहिली एन्ट्री. त्यानंतर पुढे १९४९ मध्ये जॉर्ज मुंबईत आले. मुंबईतील जॉर्ज यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. पुत्रे डिमेलो आणि राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले आणि जॉर्ज यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. पुढे ते कामगारांसाठी झपाटल्यासारखे काम करु लागले. एका घोषणेत मुंबई ठप्प करणारा नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख आहे.\


१९६७ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा जॉर्ज यांनी संसदेत प्रवेश केला. या मतदारसंघातून त्यांनी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांना पराभूत केले होते. मात्र, १९७१ मध्ये जॉर्ज पराभूत झाले. पुढे इंदिरा गांधी यांना त्यांनी कडाडून विरोधही केला. आणीबाणीच्या काळात जॉर्ज यांनी तुरुंगवासही भोगला. भारतीय रेल्वेचा इतिहासातील पहिला आणि एकमेव संप जॉर्ज फर्नांडिस यांनी १९७४ साली केला. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. इ.स. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. तसेच इ.स. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले. इ.स. २००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते.पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली.
१९३०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी उद्योग, रेल्वे आणि संरक्षण मंत्री पद्मविभूषण जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म. (मृत्यू:२९ जानेवारी २०१९)

घटना :
१८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.
१८८९: ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
१९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१९४०: डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
१९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
१९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९७९: मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
१९८९: थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
१९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.

  • मृत्यू :
  • १९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट, १८५९)
  • १९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन. (जन्म: १८ मार्च, १८८१)
  • १९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर,१९१६)
  • २०१०: मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर, १९५९)
  • २०१३: जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
  • २०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर,१९४९)

जन्म :
१८९० : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी, १९५४)
१८९०: भारतरत्‍न खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी, १९८८)
१८९२: लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर, १९८६)
१८९५ : पणिक्कर, कोवलम माधव भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक पणिक्कर, कोवलम माधव यांचा जन्म (मृत्यू : ११ डिसेंबर १९६३)
१९२४: तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट,२०१८)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »