राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना गंडवले : आंदोलन अंकुश

कोल्हापूर / शुगरटुडे
कर्नाटक मध्ये संघटना आणि सरकार ने 3500 पहिल्या उचलीचा तोडगा काढला होता.
कारखाने त्याच्या पुढे जाऊन 3800 पहिली उचल कायदेशीर परिपत्रक काढून जाहीर करत आहेत.
आपल्या इथे कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी संघटना आणि कारखानदार यांची गट्टी आहे.
कोणीही कायदेशीर परिपत्रक काढायला तयार नाही कारण बंद खोलीत वेगळं ठरलंय आणि बाहेर शेतकऱ्यांना वेगळं सांगितले जातंय. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना गंडवले आहे, असा गंभीर आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, गुलाल उधळून जल्लोष करणारा आता नेहमीप्रमाणे वर्षभर ऊस दरावर काही बोलणार नाही. कारण त्याने बंद खोलीत कारखानदारांना न बोलण्याचा शब्द दिलेला असतो.
शेतकरी वैयक्तिकरित्या कारखान्याकडे दर मागू शकत नाही. त्यामुळे यावर्षी राजू शेट्टी यांनी ऊस दरात शेतकऱ्यांना किमान 1000 रुपयाला गंडवले आहे.
साखरेची एम एस पी वाढवा, इथेनॉल चे दर वाढवा या मुद्यावर आंदोलन करा म्हणून कारखानदारांनीच सांगितले होते. यावर्षी आंदोलनही त्याच मुद्यावर झाल्याने शेतकऱ्यांचा दरात हा तोटा झाला आहे. कारखान्यांनी आणि स्वाभिमानीने ठरवून यावर्षी ऊस दरात फसवले, असा आरोपही त्यांनी केला आहे.
आता ते मुद्दे कुठे गेले.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या दरात कायम 200 ते 300 रुपये फरक असतो. आपल्या कारखान्यांची रिकव्हरी जादा असते म्हणून आपला दर जादा असतो.
कर्नाटक मध्ये आपल्या बरोबरीने दर जाहीर होत आहे . म्हणजे पहिल्या उचलीत आपली 300 रुपयांची फसवणूक झाली आहे. राजू शेट्टी यांनी कारखानदारांशी हातमिळवणी करून फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.







