मांजरा शुगर इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांसाठी भरती

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखाना प्रशासनाने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अभियांत्रिकी, उत्पादन, डिस्टिलरी आणि कॉम्प्युटर विभागातील विविध पदांचा यामध्ये समावेश आहे. १०वी, १२वी, आयटीआय, बी.एस्सी./एम.एस्सी. तसेच एमएससीआयटी यांसारखी शैक्षणिक पात्रता पदानुसार आवश्यक आहे.
अभियांत्रिकी विभागात बॉयलर हाऊस फिट्टर, मिल ऑइलमन, मिल पॅनमन, ट्रॅक्टर ऑपरेटर, क्रेन कॅरिअर ऑपरेटर, फिडर टेबल ऑपरेटर, एमबीसी ऑपरेटर, स्विच बोर्ड ऑपरेटर आणि शिकाऊ कामगार आदी पदे आहेत.
उत्पादन विभागात इन्स्ट्रुमेंटेशन केमिस्ट, डिस्टिलरी/उत्पादन ऑपरेटर, सी.एस. ऑपरेटर, ऑइल कॅचर आणि शिकाऊ कामगार पदांसाठी संधी देण्यात आली आहे.
डिस्टिलरी विभागात लॅब केमिस्ट, इव्हॅपोरेशन ऑपरेटर, सी.पी.यू./आर.ओ. ऑपरेटर तसेच शिकाऊ कामगारांची पदे आहेत.
तसेच कॉम्प्युटर विभागात कॉम्प्युटर ऑपरेटर आणि नंबर टेकर पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कारखान्यातील संबंधित पदाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद आहे.
शासनाच्या नियमानुसार मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीतील सूचनेनुसार कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा.




