साखर उद्योगाला दिलासा : सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील कोटा जाहीर!

पुणे : केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांना एकूण १३.५० लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बाजारातील साखर पुरवठा सुरळीत राहणार असून दरांमध्ये स्थिरता येण्याची अपेक्षा आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना या कोट्यातून वाटा मिळणार आहे. साखर उद्योग संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे शेतकरी व कारखानदारांना दिलासा मिळेल असे मत व्यक्त केले आहे. केंद्र सरकार दर पंधरवड्याला साखरेचा कोटा जाहीर करून बाजारातील मागणी-पुरवठा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी देशातील साखर कारखान्यांना १३.५० लाख टन साखर विक्री कोटा निश्चित केला आहे. हा कोटा १६ ते ३० सप्टेंबर २०२३६ या कालावधीसाठी लाए ‘एक्स अकाउंट’वरून मंत्रालयाने ही माहिती दिली. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी साखर कारखान्यांना १३ लाख टन कोटा देण्यात आला होता. या पूर्वी ऑगस्टसाठी केंद्राने २२.५० लाख टन साखर विक्री कोटा निश्चित केला होता. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची उपलब्धता सुरळीत ठेवणे तसेच दरामध्ये अचानक होणारे बद-उतार रोखणे, हा सरकारच्या महिन्यातील साखरेची मागणी, बाजारातील उपलब्धता आणि दरातील स्थिती यावर पुढील काळातील साखर दराची दिशा अवलंबून राहणार आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगाला स्थैर्य मिळेल, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळण्याची शक्यता वाढेल आणि ग्राहकांना दरवाढीचा ताण कमी होईल.






