श्री गणेश चतुर्थी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, सप्टेंबर १४, २०२६
युगाब्द : ५१२८
🇮🇳 भारतीय राष्ट्रीय सौर भाद्र दिनांक २३, शके १९४८
🌅 सूर्योदय : ०६:२६
🌇 सूर्यास्त : १८:४२
🌙 चंद्रोदय : ०९:१०
🌙 चंद्रास्त : २०:३७
📜 शक संवत : १९४८ पराभव
📜 संवत्सर : पराभव
☀️ दक्षिणायन
🌧️ ऋतू : वर्षा
🌙 चंद्रमास : भाद्रपद
🌕 पक्ष : शुक्ल पक्ष
🔹 तिथी : तृतीया — ०७:०६ पर्यंत
🔹 नक्षत्र : चित्रा — १३:५५ पर्यंत
🔹 योग : ब्रह्म — १२:४७ पर्यंत
🔹 करण : गर — ०७:०६ पर्यंत
🔹 द्वितीय करण : वणिज — १९:२० पर्यंत
☀️ सूर्य राशी : सिंह
🌙 चंद्र राशी : तूळ
⏰ राहुकाल : ०७:५८ ते ०९:३०
⏰ गुलिक काल : १४:०६ ते १५:३८
⏰ यमगंड : ११:०२ ते १२:३४
✨ अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १२:५८
⚠️ दुर्मुहूर्त : १२:५८ ते १३:४८
⚠️ दुर्मुहूर्त : १५:२६ ते १६:१५
🌺 अमृत काल : ०७:१८ ते ०८:५७
🌺 अमृत काल : ०६:०१ ते ०७:४३, सप्टेंबर १५
🚫 वर्ज्य : १९:५१ ते २१:३३


━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌺 आजचे विशेष 🌺 ━━━━━━━━━━━━━━━━━━
🌸 हरितालिका व्रत व पूजन
हरितालिका व्रत हे सर्व प्रकारचे दुःख, कलह, पाप आणि कौटुंबिक चिंता दूर करणारे पवित्र व्रत मानले जाते. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्यव्रत आहे.
माता पार्वतीने भगवान शिवांना पतीरूपाने प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. त्यांच्या मनोकामनेची पूर्तीही याच व्रताच्या पुण्यप्रभावाने झाली, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
🙏 आज हरितालिका पूजन आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━ 🐘 श्री गणेश चतुर्थी 🐘 ━━━━━━━━━━━━━━━━━━
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवाचा मंगल प्रारंभ होत आहे.
🪔
|| अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो यः सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ||
श्री गणेशाची पूजा ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत मंगल परंपरा आहे. विघ्नहर्ता, मंगलमूर्ती आणि बुद्धी-विवेकाचे प्रतीक असलेल्या श्री गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होते. पुढील दहा दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरा केला जातो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीय समाजात एकात्मता व राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले.
🙏 श्री गणेशाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना!
🌺 आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
🐘 || गणपती बाप्पा मोरया ||
🌺 || मंगलमूर्ती मोरया || 🐘

━━━━━━━━━━━━━━━━━ 🌼 श्रीगुरु श्रीपादराज प्राकट्य 🌼 ━━━━━━━━━━━━━━━━━━
|| या कलियुगामाझारीं । ज्ञान जाहले मूढापरी ।
कांहीं नेणती अंधबधिरीं । मायापाशें वेष्टोनियां || २२२ ||
लाधे ज्यासी गुरुप्रसाद । त्यासी प्राप्त होय कैवल्यपद ।
दूरी होईल कामक्रोधमद । साध्य होईल पद-अच्युत || २२४ ||
भूमिभार उतरावया । जन्म धरिला श्रीपाद राया ।
दत्तात्रेय-अवधूतरायें । वेष धरिला नरदेहीं || २२६ ||
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी व चित्रा नक्षत्राचा योग साधून, श्रीगुरु श्रीपादराज यांचे प्राकट्य शके १३२० मध्ये पिठापूर, आंध्रप्रदेश येथे उषःकाली, सूर्योदयाच्या वेळी झाले, अशी परंपरा सांगते.
अज्ञानाचा अंधकार दूर करून विवेकरूपी ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी श्रीगुरूंनी हीच मंगल वेळ निवडली, अशी श्रद्धा आहे.
आपण सर्वजण भक्तिभावाने श्री गजाननाची प्रतिष्ठापना करतोच; त्याचबरोबर लवकर उठून श्रीगुरु श्रीपादराजांची विशेष पूजा करण्याचा आनंद मिळणे, हीदेखील श्रीगुरुकृपाच आहे.
या विश्वातील सर्व सद्गुरूंचे गुरुतत्त्व, देवदेवता आणि कुलदेवतांचे स्वरूप श्रीगुरु श्रीपादराजांच्या चरणी व्यक्त होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.


🌺 श्रीगुरु श्रीपादराज हे श्रीगणेशाचेच श्रीदत्तात्रेय स्वरूप मानले जाते. 🌺
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🕯️ काश्मिरी हिंदू बलिदान दिन 🕯️ ━━━━━━━━━━━━━━━━━━
आज काश्मिरी हिंदू बलिदान दिन.
१९९० च्या दशकात काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादामुळे अनेक काश्मिरी हिंदूंना आपल्या मायभूमीतून विस्थापित व्हावे लागले. या काळात अनेक काश्मिरी पंडितांनी आपले प्राण गमावले.
आजच्या दिवशी दहशतवादी हिंसाचारात बलिदान दिलेल्या काश्मिरी हिंदूंच्या स्मृतींना अभिवादन केले जाते आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण केले जाते.
१९ जानेवारी हा दिवस काश्मिरी हिंदू समुदायात निर्गमन दिन किंवा काळा दिवस म्हणून पाळला जातो, असे विविध स्रोतांमध्ये नमूद केले आहे.
🙏 काश्मिरी हिंदू बांधवांच्या त्यागाला विनम्र अभिवादन! 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🇮🇳 हिंदी दिन 🇮🇳 ━━━━━━━━━━━━━━━━━━
हिंदी ही भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून ती हिंद-आर्य भाषासमूहातील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणातून विकसित झाली.
भारताच्या विविध राज्यांमध्ये हिंदी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. हिंदी ही केंद्र सरकारच्या अधिकृत कामकाजातील भाषांपैकी एक आहे.


📌 महत्त्वाची बाब :
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. भारतीय राज्यघटनेत हिंदीला संघाची राजभाषा म्हणून स्थान आहे; तसेच आठव्या अनुसूचीत २२ भाषा समाविष्ट आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५१ नुसार हिंदी भाषेच्या विकासाची जबाबदारी केंद्र सरकारवर सोपविण्यात आली आहे.
🌺 आज हिंदी दिन आहे. हिंदी भाषेच्या समृद्ध परंपरेला मनःपूर्वक अभिवादन! 🌺
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌾 दिनविशेष : डॉ. बी. पी. पाल 🌾 ━━━━━━━━━━━━━━━━━━


बेंजामिन पिअरी पाल यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला. त्यांनी रंगून विद्यापीठातून बी.एस्सी. (ऑनर्स) आणि एम.एस्सी. वनस्पतिशास्त्र (ऑनर्स) पदव्या प्राप्त केल्या.
पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात गव्हावरील संशोधन केले. स्व-परागी पिकांमध्ये संकरित जोमाचा उपयोग करता येतो, हे त्यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले.
भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी पुसा येथील इम्पिरिअल ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम केले. पुढे ही संस्था नवी दिल्ली येथे स्थलांतरित होऊन भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) म्हणून ओळखली जाऊ लागली.
या संस्थेचे संचालक होणारे ते पहिले भारतीय होते. पुढे त्यांची इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) चे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती झाली.
गहू, बटाटा, तंबाखू यांसारख्या विविध पिकांवर त्यांनी संशोधन केले. गव्हाच्या सुधारित वाणांच्या विकासामुळे भारतातील गहू उत्पादन वाढण्यास मोठी मदत झाली.
गुलाबाच्या अनेक लोकप्रिय जाती त्यांनी संकरक्रियेद्वारे विकसित केल्या. द पंजाब बेल, डॉ. होमी भाभा, दिल्ली प्रिन्सेस आणि बंजारन हे त्यांपैकी उल्लेखनीय प्रकार आहेत.
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली तसेच १६० हून अधिक संशोधनात्मक व माहितीपूर्ण लेख प्रकाशित केले.
🏆 त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीने डॉ. बी. पी. पाल स्मृती पुरस्कार सुरू केला आहे.
📅 १९८९ : भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन.
(जन्म : २६ मे १९०६)
━━━━━━━━━━━━━━━━━━ 📜 आजच्या इतिहासातील घटना 📜 ━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸 ७८६ : हारून अल्-रशीद बगदादचा खलिफा झाला.
🔸 १८९३ : सरदार खाजगीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.
🔸 १९१७ : रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
🔸 १९४८ : दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
🔸 १९५९ : सोव्हिएत संघाचे लुना-२ हे अंतराळयान चंद्रावर पोहोचले; चंद्रावर पोहोचणारी ही पहिली मानव-निर्मित वस्तू ठरली.
🔸 १९६० : OPEC अर्थात पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेची स्थापना झाली.
🔸 १९७८ : व्हेनेरा-२ हे रशियन अंतराळयान शुक्राकडे झेपावले.
🔸 १९९७ : बिलासपूर–अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण मृत्युमुखी पडले.
🔸 २००० : मायक्रोसॉफ्टने Windows ME प्रकाशित केले.
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🕯️ आजचे निधन 🕯️ ━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ १९९८ : शिक्षणतज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.
▪️ २०११ : कुस्तीगीर व प्रशिक्षक पै. हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन.
(जन्म : ५ जून १९५०)
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎂 आजचे जन्मदिनविशेष 🎂 ━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ १८६७ : वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार व लेखक विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म.
(मृत्यू : ५ फेब्रुवारी १९२०)
▪️ १८९७ : नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म.
(मृत्यू : २२ नोव्हेंबर १९५७)
▪️ १९०० : हिंदीला राजभाषेचे स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे व्यौहार राजेंद्र सिंह यांचा जन्म.
(मृत्यू : २ मार्च १९८८)
▪️ १९०१ : शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.
▪️ १९१२ : पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म.
(मृत्यू : २८ जून १९९७)
▪️ १९२१ : शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म.
(मृत्यू : ३० मे १९८९)
▪️ १९२३ : अमोघ युक्तिवादासाठी प्रसिद्ध, केंद्रीय कायदामंत्री व ज्येष्ठ कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.
(मृत्यू : ८ सप्टेंबर २०१९)
▪️ १९३२ : रंगभूमी व चित्रपट अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म.
(मृत्यू : २ मार्च १९८६)
▪️ १९४८ : ग्वाल्हेर, जयपूर व किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.
▪️ १९६३ : अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »