स्वातंत्र्यवीर सावरकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, मे २८, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ ७, शके १९४७
सूर्योदय : ०६:०१ सूर्यास्त : १९:११
चंद्रोदय : ०६:४७ चंद्रास्त : २०:५०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – ०१:५४, मे २९ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – ००:२९, मे २९ पर्यंत
योग : धृति – १९:०९ पर्यंत
करण : बालव – १५:२५ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०१:५४, मे २९ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : वृषभ – १३:३६ पर्यंत
राहुकाल : १२:३६ ते १४:१५
गुलिक काल : १०:५७ ते १२:३६
यमगण्ड : ०७:३९ ते ०९:१८
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१० ते १३:०२
अमृत काल : १६:३३ ते १७:५९
वर्ज्य : ०७:५३ ते ०९:२०

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

भारत मातेचे सुपुत्र क्रांतिकारक, समाज सुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर –

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर – असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर – अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. त्यांनंतर सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर’ सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.

जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

१८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)
ह्या महा योद्ध्यास ” विनम्र अभिवादन “

  • घटना :

१४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
१९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.
१९३७: नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९५२: ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.
१९९८: बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.

• मृत्यू :
• १९६१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै,१८९१)
१९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.
१९९९: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी ,१९२०)

  • जन्म :

१९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल ,१९९४)
१९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)
१९२३: तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी, १९९६)
१९४६: भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »