यापुढे इथेनॉलचे पंप सुरू करा : गडकरी

टोयोटाच्या सर्व गाड्या इथेनॉलवर चालणार, साखर उत्पादन कमी करा
पुणे : आगामी तीन महिन्यात टोयोटा मोटर्सची बहुतांश वाहने संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी असतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात दिली.
याबाबतचे धोरण लवकरच जाहीर होणार आहे, सहा महिन्यांमध्ये ते अंतिम होईल आणि साखर कारखान्यांसह सर्वांना इथेनॉल पंप सुरू करता येतील, असे गडकरी म्हणाले.
‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘इथेनॉल कॉन्क्लेव्ह’ मध्ये गडकरी बोलत होते. होंडा, हुंडाई, मर्सीडीज आदी कंपन्यांची वाहनेही भविष्यात इथेनॉलवर चालणारी असतील, असे सांगताना फ्लेक्स इंजिनच्या विकसनात चांगले योगदान दिल्याबद्दल गडकरी यांनी टोयोटा किर्लोस्करचे दिवंगत व्यवस्थापकीय संचालक विक्रम किर्लोस्करचे कौतुक केले. किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली.
सविस्तर भाषण ऐका खालील लिंकवर