या कारखान्यांनी दिली FRP पेक्षा अधिक रक्कम

पुणे : शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीची बिले कशी द्यायची, असा प्रश्न काही साखर कारखान्यांना सतावत असताना, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.
एकंदरित १०८ साखर कारखान्यांनी देय एफआरपीच्या शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम अदा केली आहे. तब्बल ९७ साखर कारखान्यांनी एफआरपी रकमेपेक्षा अधिक देयके दिली असल्याचे साखर आयुक्तालयाने हंगामाच्या अखेरीस जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. ही रक्कम १० लाखांपासून तब्बल ८४ कोटींपर्यंत आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम ८४ कोटी अधिक दिली आहे. उदगिरी शुगर सारखे कारखाने सातत्याने एफआरपी पेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना देत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. मात्र त्याचवेळी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक युनिट वगळता, इतर तीन युनिटकडे थकबाकी दिसते.
त्यामध्ये पस्तीसवर सहकारी साखर कारखाने आहेत. यंदाचा हंगाम साखर उद्योगासाठी अडचणीचा गेला आहे. मात्र निम्म्याहून अधिक कारखान्यांनी एफआरपी देण्यात कुचराई केलेली नाही, असे स्पष्ट होते. तरीदेखील ८६४ कोटींची थकबाकी ९२ साखर कारखान्यांकडे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही माजी मंत्र्यांच्या कारखान्यांकडेही थकबाकी आहे हे विशेष उल्लेखनीय…
नुकत्याच सरलेल्या ऊस गळीत हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले आणि ८५४ लाख टन गाळप केले. उसाअभावी हंगाम लवकर आवरावा लागला होता. त्यामुळे साखर उद्योगात चिंतेचे वातावरण होते, मात्र आगामी हंगाम चांगला जाण्याच्या आशेवर आता भिस्त आहे.
एफआरपी पेक्षा अधिक बिले देणाऱ्या कारखान्यांची यादी (आकडे लाखांत /जादा दिलेली रक्कम)
- श्री दत्त शेतकरी सह. साखर कारखाना लि., शिरोळ – ६४४
- कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सह. सा. कारखाना., इचलकरंजी – ३४२
- सदाशिवराव मंडलिक ससाका – ४१८
- शरद ससाका, हातकणंकले – २८१
- तात्यासाहेब कोरे वारणा ससाका – ३४८८
- उदयसिंग गायकवाड ससाका (अथणी शुगर) – १२७३
- सरसेनापती संताजी घोरपडे ससाका – ९८६
- ओंकार शुगर, राधानगरी – १६६
- अथणी शुगर, ता. भुदरगड – ७३८
- दौलत शेतकरी ससाका (अथर्व इंटरट्रेड प्रा.लि.) – ३०३
- राजारामबापू ससाका, यु. ४ – ५१५
- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा ससाका – ४९८
- वसंतदादा शेतकरी ससाका (दत्त इंडिया) – ६३७
- विश्वासराव नाईक ससाका – ४०६
- क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड ससाका – ९०
- सद्गुरू श्री श्री शुगर (सांगली) – २०२०
- उदगिरी शुगर अँड पॉवर लि. (सांगली) – ८६२
- रायगाव शुगर, कडेगाव – ३८०
- श्रीपती शुगर अँड पॉवर (सांगली) – ८७६
- यशवंत शुगर अँड पॉवर – (सांगली) २०५
- एसीझेड शुगर अँड पॉवर (सांगली) ३३९
- भीमाशंकर ससाका (पुणे) – १०
- माळेगाव ससाका (पुणे) – ६६
- व्यंकटेश कृपा शुगर (पुणे) – ३७२
- श्री सोमेश्वर ससाका. (पुणे) – १२
- दौंड शुगर प्रा. लि. (पुणे) – २५३६
- बारामती ॲग्रो (पुणे) – १६०५
- श्री छत्रपती ससाका (पुणे) – ६०५
- सह्याद्री ससाका (सातारा) – ७८
- स्वराज इंडिया ॲग्रो (सातारा) – २६९५
- खटाव माण तालुका ॲग्रो – ४२५
- जरंडेश्वर शुगर (सातारा) – ८४६३
- किसनवीर खंडाळा – ६४५
- यशवंतराव मोहिते कृष्णा ससाका – ९०२
- रयत सह. शुगर (अथणी शुगर, कराड) – २०४०
- श्रीराम ससाका (कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर ससाका) – १२४२
- जयवंत शुगर लि. – ७३४
- शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज – ४६२७
- श्री दत्त इंडिया (फलटण) – २५६२
- शिवनेरी शुगर्स लि. (सातारा) – ४०२०
- सहकारमहर्षी मोहिते ससाका (सोलापूर) – २३३
- विठ्ठलराव शिंदे ससाका – २३८
- संत कुर्मदास ससाका – १२.५०
- दी सासवड माळी शुगर – ११२
- लोकमंगल ॲग्रो (उ. सोलापूर) – १३१
- विठ्ठल कॉर्पोरेशन – १४०३
- जकराया शुगर लि. – ४८६
- यूटोपीयन शुगर लि. १८४६
- बबनराव शिंदे शुगर – १०५१
- ओंकार शुगर (माळशिरस) – १९४२
- व्ही. पी. शुगर्स – ४११४
- विठ्ठराव शिंदे ससाका यु. २ – ३२
- आष्टी शुगर लि. – १९३५
- सीताराम महाराज ससाका – १८२३
- श्री शंकर ससाका – ७५१
- येडेश्वरी ॲग्रो यु. २ – ११५
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर ससाका – ५४९
- भैरवनाथ शुगर (वाशी, धाराशिव) – १४७
- भैरवनाथ शुगर (परांडा, धाराशिव) – १२७
- लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज – १६४
- कंचेश्वर शुगर – २५६
- बाणगंगा ससाका (अयान मल्टिट्रेड) – २४१२
- अशोक ससाका – २९७
- प्रसाद शुगर अँड अलाइड इंड – १८७१
- श्री गणेश ससाका – १२९
- सहकारमहर्षी नागवडे ससाका – १९३
- सहकारमहर्षी थोराम ससाका – ५११
- जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो – ३१८
- क्रांती शुगर अँड पॉवर – ४२६
- श्रीकृपया शुगर ॲड अलाइड इंड. – १८६५
- सोपानराव ढसाळ ॲग्रो – ७३५
- द्वारकाधीश साखर कारखाना – ७२२
- नाशिक ससाका (अष्टलक्ष्मी शुगर) – ३५९
- एस. जे. शुगर अँड डिस्टिलरी – २४३
- अयान मल्टिट्रेड (नंदुरबार) – २८२७
- सातपुडा तापी ससाका (ओंकार शुगर यु. ९) – ६३७
- चोपडा ससाका (बारामती ॲग्रो) – १३३
- रेणुकादेवी शरद ससाका – १९९
- बारामती ॲग्रो लि. (कन्नड) – १३७
- छत्रपती ससाका (बीड) – १९
- जय महेश एनएसएल शुगर – १६२३
- वैद्यनाथ ससाका (ओंकार शुगर यु. ८) – ११२६
- गजानन ससाका, (डीव्हीपी कमोडिटी, राजुरी) – १४८
- गंगाखेड शुगर अँड एनर्जी – १०१७
- ट्वेंटी वन शुगर (परभणी) – २८३
- श्री तुळजाभवानी शुगर – ११
- टोकाई ससाका – २७३
- शिवूर शुगर फॅक्टरी – ३७३
- श्री सुभाष शुगर – १३१५
- एमव्हीके ॲग्रो फूड – ३४०
- मांजरा ससाका – ७६६
- विलास ससाका – ६८
- रेणा ससाका १६२
- संत शिरोमणी मारोती महाराज ससाका – ७७
- श्री साईबाबा शुगर – ३०५
- निलंगेकर ससाका (ओंकार शुगर) – ३८६
- शेतकरी ससाका – ४६
(स्रोत : साखर आयुक्तालय / मे २०२५)