अंगारक चतुर्थी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, सप्टेंबर २९, २०२६
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ७, शके १९४८

━━━━━━━━━━━━━━━━━━

🌅 सूर्योदय : ०६:२९
🌇 सूर्यास्त : १८:२९
🌙 चंद्रोदय : २०:२०
🌙 चंद्रास्त : ०८:४३

शक संवत : १९४८ पराभव
संवत्सर : पराभव
अयन : दक्षिणायन
ऋतु : वर्षा

━━━━━━━━━━━━━━━━━━

🌙 चंद्रमास : भाद्रपद
🌗 पक्ष : कृष्ण पक्ष
📜 तिथी : तृतीया — १७:०९ पर्यंत
⭐ नक्षत्र : अश्विनी — ०९:०३ पर्यंत
🔱 योग : हर्षण — ०३:२०, सप्टेंबर ३० पर्यंत
🪔 करण : विष्टि — १७:०९ पर्यंत
द्वितीय करण : बव — ०४:०३, सप्टेंबर ३० पर्यंत

☀️ सूर्य राशी : कन्या
🌙 चंद्र राशी : मेष

━━━━━━━━━━━━━━━━━━

⏰ राहुकाल : १५:२९ ते १६:५९
⏰ गुलिक काल : १२:२९ ते १३:५९
⏰ यमगंड : ०९:२९ ते १०:५९
✨ अभिजित मुहूर्त : १२:०५ ते १२:५३
⚠️ दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४१
⚠️ दुर्मुहूर्त : २३:१७ ते ००:०५, सप्टेंबर ३०
🌸 अमृत काल : ०३:०६ ते ०४:३६, सप्टेंबर ३०
🚫 वर्ज्य : १८:०४ ते १९:३४

━━━━━━━━━━━━━━━━━━

🙏 श्री गणेश मंत्र

अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते ।
मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः ॥

🔴 आज अंगारक चतुर्थी आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━

❤️ आरोग्यविषयक संदेश

कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ही गोष्ट ताबडतोब बंद करणे आवश्यक आहे. हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते.

जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा, तसेच नियमित फलाहार घ्यावा.

संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखाद्या छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

❤️ आज जागतिक हृदय दिन आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━

📚 दिनविशेष

हमीद उमर दलवाई हे मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन केले.

मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा-माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचारप्रणालीचा प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते.

हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६ मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी, हा या मोर्च्याचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा.

महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत, यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले.

त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे.

त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी.

समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कोणाही नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.

🎂 १९३२ : मुस्लिम सत्यशोधक चळवळीतील अग्रणी हमीद दलवाई यांचा जन्म.
(मृत्यू : ३ मे, १९७७)

━━━━━━━━━━━━━━━━━━

📜 घटना

१८२९ : लंडनच्या मेट्रोपॉलिटिन पोलिसांच्या पथकाची स्थापना झाली.

१९१६ : जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.

१९१७ : दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा, किंग जॉर्ज हायस्कूल, सुरू झाली.

१९४१ : दुसरे महायुद्ध — किएव्हामध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यू लोकांना ठार मारले.

१९६३ : बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कलकत्ता येथे सुरू झाले.

१९९१ : हैतीमध्ये लष्करी उठाव झाला.

२००८ : लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक ७७८ अंकांनी घसरला. अमेरिकन शेअर बाजारातील ती सर्वात मोठी घट होती.

━━━━━━━━━━━━━━━━━━

🕯️ मृत्यू

१९९१ : आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खान यांचे निधन.
(जन्म : १५ नोव्हेंबर, १९२७)

━━━━━━━━━━━━━━━━━━

🎂 जन्म

१८९० : पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री यांचा जन्म.

१९२५ : समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म.
(मृत्यू : १५ जानेवारी, २०१३)

१९२८ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म.
(मृत्यू : २८ सप्टेंबर, २०१२)

१९३२ : विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म.
(मृत्यू : २३ जुलै, २००४)

१९४७ : भारताचे ३८ वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म.
(मृत्यू : ४ जानेवारी, २०१६)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »