क्रांतिकारक शहीद भगतसिंग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, सप्टेंबर २८, २०२६
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ६, शके १९४८
🌅 सूर्योदय ०६:२८
🌇 सूर्यास्त १८:३०
🌙 चंद्रोदय १९:३५
🌙 चंद्रास्त ०७:४२
शक संवत : १९४८ पराभव
संवत्सर : पराभव
अयन : दक्षिणायन
ऋतु : वर्षा


🌙 पंचांग
चंद्रमास : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वितीया — १९:१३ पर्यंत
नक्षत्र : रेवती — १०:१६ पर्यंत
योग : ध्रुव — ०८:५४ पर्यंत
क्षय योग : व्याघात — ०६:१३, सप्टेंबर २९ पर्यंत
करण : तैतिल — ०८:०८ पर्यंत
द्वितीय करण : गर — १९:१३ पर्यंत
क्षय करण : वणिज — ०६:१३, सप्टेंबर २९ पर्यंत
सूर्य राशी : कन्या
चंद्र राशी : मीन — १०:१६ पर्यंत
⏰ कालविभाग
राहुकाल : ०७:५९ ते ०९:२९
गुलिक काल : १३:५९ ते १५:२९
यमगण्ड : १०:५९ ते १२:२९
अभिजित मुहूर्त : १२:०५ ते १२:५३
दुर्मुहूर्त : १२:५३ ते १३:४१
दुर्मुहूर्त : १५:१७ ते १६:०५
अमृत काल : ०७:५७ ते ०९:२९
अमृत काल : ०२:१३, सप्टेंबर २९ ते ०३:४४, सप्टेंबर २९
वर्ज्य : ०५:१५, सप्टेंबर २९ ते ०६:४६, सप्टेंबर २९
━━━━━━━━━━━━━━━━━━


🌟 दिनविशेष
२०२३ : भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन
हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी *‘एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’*ची स्थापना केली. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली.
(जन्म : कुंभकोणम, ७ ऑगस्ट १९२५)
१९२९ : भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म
भारतातील जास्तीत जास्त लोकांना माहीत असलेल्या भारतीय व्यक्तींमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जगप्रसिद्ध पार्श्वगायिका म्हणून त्यांनी भारतीय संगीतविश्वावर अमिट ठसा उमटवला.
(मृत्यू : ६ फेब्रुवारी २०२२)
१९०९ : ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म.
(मृत्यू : ११ ऑगस्ट २०००)


🇮🇳 क्रांतिकारक शहीद भगतसिंग
क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा नेता, निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरा जाणारा ‘देशभक्त’, ‘प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी’, ‘जहाल क्रांतिकारक’ अशी भगतसिंग यांची ओळख आजही आपल्या मनात कायम आहे.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करून ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन पी. सॅण्डर्स यांच्या हत्येप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचे रक्त आणखी पेटून उठले आणि त्यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रखर झाली.


१९०७ : क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म
(बलिदान दिन : २३ मार्च १९३१)
भगतसिंग यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी :

– तरुण वयातच आपल्या कार्याची दिशा त्यांना पक्की ठाऊक होती. ते बंडखोर होतेच; पण जगातल्या सगळ्या दुःख-दैन्याबाबत त्यांच्या मनात करुणाही होती. म्हणूनच क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची ओळख एका द्रष्ट्या, करुणा बाळगणाऱ्या मानवतावादी व्यक्ती म्हणूनही केली जाते. स्वतःवरील खटल्याचा वापर क्रांतीच्या प्रसारासाठी करणारा मुत्सद्दीपणाही त्यांच्या अंगी होता. वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी देशासाठी त्यांनी हसत हसत बलिदान दिले.
– भगतसिंग यांची वाचनाची आवड इतकी प्रचंड होती की त्यांना फाशी देण्याआधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता यांनी आणलेले पुस्तक त्यांनी भरभर वाचायला सुरुवात केली. त्यांच्या या पुस्तकवेडाने प्राणनाथ मेहताही अचंबित झाले होते.


– पुस्तक वाचनातून त्यांना ज्या काही गोष्टींची नव्याने माहिती मिळत होती, समजत होती, त्याची ते टिप्पणी तयार करत. तुरुंगात असताना त्यांनी काही पुस्तके लिहिली होती. ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोशॅलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’ आणि ‘अॅट द डोअर ऑफ डेथ’ ही चार पुस्तके लिहिली होती.
– दिल्ली असेंब्लीत बॉम्ब टाकण्यासाठी जाताना भगतसिंगांना माहीत होते की आपण आता परत येणार नाही. तेव्हा त्यांनी आपले नवे बूट भेट म्हणून आपले सहकारी जयदेव कपूर यांना दिले होते आणि त्यांची जुनी पादत्राणे स्वतः घातली होती.
━━━━━━━━━━━━━━━━━━
📜 घटना
१९२४ : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
१९२८ : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ आढळली. यातूनच पुढे पेनिसिलीन प्रतिजैविकांचा शोध लागला.
१९३९ : दुसरे महायुद्ध — वॉर्सने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९५८ : फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले.
२००८ : स्पेसएक्स कंपनीने फाल्कन १ हे खाजगी अंतराळ प्रक्षेपण यशस्वी केले.


🕯️ मृत्यू
१९६७ : क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचे निधन.
(जन्म : १२ नोव्हेंबर १८८०)
१९९२ : पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन.
१९९४ : विनोदी अभिनेते के. ए. थांगवेलू यांचे निधन.
(जन्म : १५ जानेवारी १९१७)
२००० : सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.
२००४ : इंग्रजीतून लेखन करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन.
(जन्म : १२ डिसेंबर १९०५)
२०१२ : शोले चित्रपटासाठी सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध चित्रपट संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन.
२०१२ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांचे निधन.
(जन्म : २९ सप्टेंबर १९२८)


🎂 जन्म
१८९८ : स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र उर्फ मामाराव दाते यांचा जन्म.
१९६६ : भारतीय दिग्दर्शक, निर्माते व पटकथा लेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.
१९८२ : ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »