साखरेची आधारभूत विक्री किंमत प्रतिकिलो ५५ रुपये करावी : कोरे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वारणानगर : बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो ५० रुपयांपेक्षा अधिक राहतील, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले. गळीत हंगामातील दसरा हप्ता प्रतिटन १११ रुपये दिवाळीपूर्वी देणार, अशी घोषणाही त्यांनी केली.

वारणा सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. या सभेत बोलताना डॉ. कोरे यांनी केंद्र सरकारने साखरेची आधारभूत विक्री किंमत प्रतिकिलो ५५ रुपये करावी, असा ठराव मांडला. सभासदांनी तो मंजूर केला.

कारखान्याच्या मालकीचा २२ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून तो नव्या वर्षात कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »