दुष्काळाचा साखर उद्योगाला फटका; कारखान्यांना प्रतिटन ७०० रुपये अनुदान द्या : बिपिन कोल्हे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोपरगाव : पावसाने सलग तीन महिने ओढ दिल्यामुळे ऊसपिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. यंदा साखर उतारा आणि उत्पादन घटण्याची शक्यता असून, पुढील गळीत हंगामात उसाच्या उपलब्धतेचे मोठे आव्हान निर्माण होईल, असे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी सांगितले.

साखर उद्योगाला आधार देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी प्रतिटन ३५० रुपये, असे एकूण ७०० रुपये प्रतिटन अनुदान सर्व साखर कारखान्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते.

पुढील हंगामाचे आतापासून नियोजन न केल्यास राज्यातील सुमारे ५० टक्के साखर कारखाने बंद पडण्याचा धोका आहे, असा इशाराही कोल्हे यांनी दिला. कार्यक्रमाला आमदार विवेक कोल्हे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »