आज तुकाराम बीज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, मार्च ९, २०२३ रोजीचे

पंचांग आणि दिनविशेष


युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १८, शके १९४४
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५२ सूर्यास्त : १८:४६
चंद्रोदय : २०:२४ चंद्रास्त : ०७:५८
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – २०:५४ पर्यंत
नक्षत्र : हस्त – ०५:५७, मार्च १० पर्यंत
योग : गण्ड – २१:०८ पर्यंत
करण : तैतिल – ०८:२१ पर्यंत
द्वितीय करण : गर – २०:५४ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १४:१८ ते १५:४८
गुलिक काल : ०९:५१ ते ११:२०
यमगण्ड : ०६:५२ ते ०८:२१
अभिजित मुहूर्त : १२:२५ ते १३:१३
दुर्मुहूर्त : १०:५० ते ११:३८
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२३
अमृत काल : २३:३३ ते ०१:१५, मार्च १०
वर्ज्य : १३:१८ ते १५:००

। जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।

संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. या दिवशी तुकाराम महाराजांचे साधक संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते.

संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला देहु गावात झाला. पंढरपूरचे विठ्ठूल माऊली हे हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरु ‘ म्हणून ओळखतात.

आज तुकाराम बीज आहे

आई म्हणोनी कोणी,
आईस हाक मारी
ती हाक येई कानी,
मज होय शोककारी
नोहेच हाक माते,
मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?
आई घरी न दारी

चारा मुखी पिलांच्या
चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना
ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी
व्याकूळ जीव होई

येशील तू घराला
परतून केधवा गे?
रुसणार मी न आता
जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी,
आई घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी

  • कवी यशवंत दिनकर पेंढरकर
    १८९९ : महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

के. आसिफ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक व पटकथालेखक होते.
हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व पटकथालेखन त्याने केले. के. आसिफ यांचे नाव ‘करीमुद्दीन’ असे होते. आरंभी ते शिंप्याचा व्यवसाय करीत होते. त्यानंतर त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्याच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचा मालक सिराज अली हकीम याने त्याच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या मदतीने त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले.
त्यांच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले . या नाटकावर चित्रपट काढण्याचे त्याने ठरविले. या चित्रपटास सिराज अली हकीम यांनी पैसा पुरविला. शापुरजी पालनजी नावाच्या सावकारानेही या चित्रपटासाठी वित्त पुरवले. चित्रपट बनण्यास सुमारे १२ वर्षे लागली. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्याने ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली.
• १९७१: दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन. (जन्म: १४ जून , १९२२)

घटना :
१९४५: दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
१९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
१९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

• मृत्यू :

  • १९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)
  • १९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन. (जन्म: ३० मार्च, १९०८)
  • २०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल , १९२९)
  • २०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी , १९३९)

जन्म :
१८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी, १९०१)
१९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.
१९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.
१९३८ : पंडित श्रीधर यशवंत पाध्ये राजापूरमधील आडिवरे गावचे सुपुत्र तसेच दिल्ली व अजराडा घराण्याचे अभ्यासक, तबलावादक, तालमहर्षी गुरुवर्य पंडित श्रीधर यशवंत पाध्ये यांचा जन्म
१९५१: प्रख्यात तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.
१९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.
१९५६: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.
१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »