सुपपासून तयार केलेल्या इंधनावर धावली रेल्वे, पण कुठे ?

क्यूशू, जपान – क्यूशू प्रांतामध्ये ऑगस्टपासून नवी रेल्वे सुरू झाली आहे. तुम्ही म्हणाल, त्यात काय नवीन. ही रेल्वे खाद्यतेल आणि सूप या इंधनावर पळते. मग आहे की नाही नवीन?
टाकाचिहो शहरात ही रेल्वे सुरू झाली. ती उघड्या डब्ब्याची असून, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी खास सुरू करण्यात आली. जुने स्वयंपाक तेल आणि रामेन सूप लार्डपासून बनलेल्या जैवइंधनावर ती धावू लागली. जगभर इथेनॉल इंधनाची चर्चा सुरू असताना जपानच्या रेल्वेने नवाच प्रयोग करून साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे.

हे जैवइंधन निशिदा शौन या वाहतूक कंपनीने विकसित केले आहे. The Mainichi मध्ये याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वापरानंतर टाकून दिलेले टेंपुरा तेल, खाऊन शिल्लक राहिलेल्या रामेन सूपमधील लार्डमध्ये 9: 1 च्या प्रमाणात मिसळले जाते आणि पुन्हा अधिक शुद्ध (रेफाईन) केले जाते. त्यामुळे काळा धूर निघत नाही. ते पर्यावरणास अनुकूल बनते . लार्ड हा डुकराच्या चरबीपासून बनवले जाते.
ताकाचिहो अमातेरासू रेल्वे कंपनीच्या असे निदर्शनास आले की, चाचणीवेळी चढावर जातानाही या ट्रेनचे इंजिन सुरळीतपणे काम करते . डिझेल इंधनावर चालनाऱ्या इंजिनप्रमाणे एक्झॉस्ट गॅसचा तीव्र वासही येत नाही. उलट, चायनीज रेस्टॉरंटमध्ये पदार्थ तळले जात असताना तोंडाला पाणी सोडणारा खमंग वास येतो, तसा सुगंध बाहेर पडत होता. नवीन प्रकारच्या इंधनाची किंमत डिझेल प्रमाणेच असल्याचे सांगण्यात आले. मात्र ते पर्यावरणपूरक आहे.
विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा..