ऊस गाळप सुरू होण्यापूर्वी एफआरपीचा प्रश्न ऐरणीवर!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील नवीन ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, मागील २०२५-२६ हंगामातील शेतकऱ्यांच्या उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) अद्याप पूर्णपणे मिळालेली नाही. राज्यातील ३० साखर कारखान्यांकडे सुमारे १९४ कोटी रुपयांची एफआरपी थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या हंगामात राज्यात सुमारे १०४५ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यापैकी ऊस तोडणी व वाहतूक खर्चासह शेतकऱ्यांची देय रक्कम सुमारे ४० हजार ४४६ कोटी रुपये होती. यातील मोठा हिस्सा कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे.

मात्र, ३० कारखान्यांनी अद्याप एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केलेली नाही. दुष्काळाच्या छायेत थकीत एफआरपीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून, संबंधित कारखान्यांकडून रक्कम वसुलीसाठी प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार कारवाई करण्यात आली असून, काही कारखान्यांच्या सुनावण्याही घेण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »