प्रबोधनकार ठाकरे जयंती

आज गुरुवार, सप्टेंबर १७, २०२६
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर भाद्र दिनांक २६, शके १९४८
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌞 पंचांग 🌞 ━━━━━━━━━━━━━━━━━━
🌅 सूर्योदय : ०६:२६
🌇 सूर्यास्त : १८:३९
🌙 चंद्रोदय : ११:५४
🌙 चंद्रास्त : २२:४७
शक संवत : १९४८ पराभव
संवत्सर : पराभव
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
🌙 चंद्रमास : भाद्रपद
🌸 पक्ष : शुक्ल पक्ष
🔸 तिथी : षष्ठी — १०:४७ पर्यंत
🔸 नक्षत्र : अनुराधा — १९:५३ पर्यंत
🔸 योग : विष्कम्भ — १२:५० पर्यंत
🔸 करण : तैतिल — १०:४७ पर्यंत
🔸 द्वितीय करण : गर — २३:५१ पर्यंत
☀️ सूर्य राशी : सिंह — ०७:५८ पर्यंत
🌙 चंद्र राशी : वृश्चिक
━━━━━━━━━━━━━━━━━━ ⏰ कालविभाग ⏰ ━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 राहुकाल : १४:०४ ते १५:३६
🟡 गुलिक काल : ०९:३० ते ११:०१
⚫ यमगंड : ०६:२६ ते ०७:५८
✨ अभिजित मुहूर्त : १२:०८ ते १२:५७
⚠️ दुर्मुहूर्त :
१०:३१ ते ११:२०
१५:२४ ते १६:१३
🌸 अमृत काल : ०८:२४ ते १०:१०
⚠️ वर्ज्य : ०२:०९, सप्टेंबर १८ ते ०३:५७, सप्टेंबर १८
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌺 आजचे विशेष — गौरी आगमन 🌺 ━━━━━━━━━━━━━━━━━━
“लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी,
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली,
मालकाच्या घरी लक्ष्मी आली…”
आज तेज, समृद्धी, सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गौरींचे आगमन आहे.
गौरीमातेच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच मंगलमय प्रार्थना. 🙏🌺
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌾 बलराम जयंती / षष्ठी व्रत 🌾 ━━━━━━━━━━━━━━━━━━
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे. आज या पवित्र महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी हा दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
ही तिथी बलराम जयंती म्हणूनही ओळखली जाते. भगवान बलराम यांना भगवान शेषनागाचा अवतार मानले जाते.
धार्मिक ग्रंथांमध्ये बलरामजींचे नाव हलधर असेही आढळते. त्यांच्या हातातील हलामुळे या तिथीला हल षष्ठी असेही म्हटले जाते.
संततीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी षष्ठी व्रत करण्याची परंपरा आहे. या दिवशी भक्तिभावाने व्रत, पूजन आणि प्रार्थना केली जाते.
🌿 आज बलराम जयंती आहे. 🌿
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛕 श्री विश्वकर्मा दिन / पूजा 🛠️ ━━━━━━━━━━━━━━━━━━
“प्रभासस्य तस्य भार्या बसूनामष्टमस्य च।
विश्वकर्मा सुतस्तस्य शिल्पकर्ता प्रजापतिः॥”
॥ दोहा ॥
श्री विश्वकर्म प्रभु वन्दऊं,
चरणकमल धरि ध्यान ।
श्री, शुभ, बल अरु शिल्पगुण,
दीजै दया निधान ॥
भगवान विश्वकर्मा हे सृष्टीतील शिल्प, वास्तू, स्थापत्य आणि कारागिरीचे अधिदैवत मानले जातात.
आजही सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार इत्यादी विविध कारागीर समाज भगवान विश्वकर्मा यांना आपले दैवत मानतात. भारतात १७ सप्टेंबर हा दिवस विश्वकर्मा दिन / विश्वकर्मा पूजा म्हणून साजरा केला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━ 📜 प्रबोधनकार ठाकरे जयंती 📜 ━━━━━━━━━━━━━━━━━━
केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी झाला.
ते मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, लेखक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे त्यांचे पुत्र होत.
सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही.
बालविवाह, विधवांचे केशवपन, अस्पृश्यता, हुंडाप्रथा तसेच सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात त्यांनी आवाज उठवला.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा लढा होता. सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक विचारांचा प्रसार केला.
कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले.
तसेच समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई यांची चरित्रे आणि माझी जीवनगाथा हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.
📌 १८८५ : पत्रकार, समाजसुधारक, लेखक व वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म.
(मृत्यू : २० नोव्हेंबर १९७३)
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎶 वसंत बापट स्मृतिदिन 🎶 ━━━━━━━━━━━━━━━━━━
“गगन सदन तेजोमय,
तिमिर हरून करुणाकर,
दे प्रकाश, देई अभय…”
— कवी वसंत बापट
२००२ मध्ये कवी, वक्ते, कलावंत आणि संपादक वसंत बापट यांचे निधन झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔬 पेरियार ई. व्ही. रामस्वामी 🔬 ━━━━━━━━━━━━━━━━━━
पेरियार ईरोड वेंकट नायकर रामस्वामी हे विज्ञाननिष्ठ, तर्कवादी आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील प्रमुख विचारवंत होते.
लहानपणापासूनच ते परंपरावाद, अंधश्रद्धा आणि धर्मग्रंथांतील विचारांवर चिकित्सक प्रश्न उपस्थित करीत असत. गरीब आणि वंचित समाजाची परिस्थिती पाहून त्यांनी सामाजिक समानता आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य सुरू केले.
१९०५ पासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. एरोडमध्ये प्लेगची साथ आली असताना त्यांनी रोग्यांची सेवा केली आणि मृतांवर अंत्यसंस्कारही केले.
१९१८ मध्ये ते एरोड नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून १९२०च्या असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.
त्रावणकोरमधील वैक्कोम सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. सामाजिक समानता आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी व्यापक कार्य केले.
१९२५ साली त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह आणि सामाजिक समानतेचा त्यांनी पुरस्कार केला.
१९३१ मध्ये त्यांनी रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेनचा दौरा केला. पुढे त्यांनी सामाजिक क्रांती, जातिभेदविरोध आणि तर्कवादी विचारांचा प्रसार केला.
१९४४ मध्ये जुन्या जस्टिस पक्षाचे रूपांतर द्रविड कळघम या संघटनेत करण्यात आले.
धर्म, जात आणि भाषा यांच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला विरोध करणे, सामाजिक समानता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
📌 १८७९ : स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म.
(मृत्यू : २४ डिसेंबर १९७३)
━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 अनंत पै ऊर्फ अंकल पै 📚 ━━━━━━━━━━━━━━━━━━
अमर चित्र कथाचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म १७ सप्टेंबर १९२९ रोजी झाला.
भारतीय पुराणकथा, इतिहास आणि संस्कृतीतील कथा चित्रकथांच्या माध्यमातून बालवाचकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
(मृत्यू : २४ फेब्रुवारी २०११)
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎂 जन्मदिन विशेष 🎂 ━━━━━━━━━━━━━━━━━━
🇮🇳 भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला.
श्री नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 आजच्या इतिहासातील घटना 📅 ━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 १६३० : बोस्टन शहराची स्थापना झाली.
🔹 १९३९ : ह.भ.प. संत कवी श्री दासगणु महाराज लिखित ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. महाराजांच्या अवतारकार्याचा हा अमृतठेवा भक्तगणांसाठी उपलब्ध झाला.
🔹 १९४८ : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
🇮🇳 आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन.
🔹 १९५७ : मलेशियाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला.
🔹 १९८३ : वनीसा विल्यम्स या पहिल्या कृष्णवर्णीय मिस अमेरिका ठरल्या.
🔹 २००१ : ११ सप्टेंबर २००१च्या हल्ल्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌹 स्मृतिदिन 🌹 ━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸 १९९९ : हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी यांचे निधन.
(जन्म : १५ एप्रिल १९२२)
🔸 २०२५ : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन.
(जन्म : १९ डिसेंबर १९४७)
━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌼 आजचे जन्मदिन विशेष 🌼 ━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸 १८८२ : महात्मा गांधींच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाजाच्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.
🔸 १९१५ : चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म.
(मृत्यू : ९ जून २०११)
🔸 १९२९ : अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म.
(मृत्यू : २४ फेब्रुवारी २०११)
🔸 १९३० : व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म.
(मृत्यू : २२ एप्रिल २०१३)
🔸 १९३२ : भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.
🔸 १९३७ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.
🔸 १९३८ : लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म.
(मृत्यू : १० डिसेंबर २००९)
🔸 १९३९ : गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म.
(मृत्यू : २२ नोव्हेंबर २००८)
🔸 १९५१ : समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.
🔸 १९८६ : भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.






