हेल्पर ते साखर कारखानदार : वाढदिवस विशेष

आवडल्यास ही बातमी शेअर करा
यशोगाथा

साखर उद्योगासह बँकिंग, शेतकरी आणि महिला सक्षमीकरण आदी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. पांडुरंग राऊत. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांचे संस्थापक… त्यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.

‘शुगरटुडे’ने त्यांची दोन वर्षांपूर्वी विशेष मुलाखत घेतली होती, ती आज पुन्हा वाचकांसाठी देत आहोत. त्यांचा जीवनप्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे….

त्यांच्या करिअरचा प्रवास पुण्यातील एका मोटर रिवाडिंग शॉपमध्ये हेल्पर म्हणून सुरू झाला आणि आज ते आहेत एका साखर कारखान्याचे संस्थापक आणि चेअरमन.

शिक्षण अवघं दहावी असताना, त्यांनी समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात डोंगराएवढं काम उभे केले आहे.
शून्यातून विश्वनिर्मिती हा वाक्प्रचार त्यांच्यासाठी तंतोतंत लागू होतो. पण त्यांनी हे विश्व स्वत:साठी, नव्हे तर सर्वसामान्यांसाठी उभे केलं.

त्यांनी केवळ साखर कारखानाच नव्हे, तर अनेक संस्थांची उभारणी केली आहे.
सर्वांसाठी प्रेरणादायी असलेली त्यांची हेल्पर ते साखर कारखानदार ही झेप ऐकू या त्यांच्याकडूनच….

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »