ऊस उत्पादकांच्या मागण्यांची दखल; साखर कारखान्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उमरखेड : विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध समस्या सोडविण्यासाठी उमरखेड तालुका ऊस उत्पादक संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अमरावती विभागाच्या साखर आयुक्तांनी विदर्भातील साखर कारखान्यांना अधिकृत पत्राद्वारे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उसाचा योग्य आणि रास्त दर मिळावा, त्यांच्या हिताचे निर्णय कारखान्यांनी वेळेत घ्यावेत आणि आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशा मागण्या संघटनेने निवेदनातून केल्या होत्या. संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत कारखान्यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, वजनातील पारदर्शकता आणि उसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेत सुटावेत, यासाठी प्रशासनासमोर ठामपणे भूमिका मांडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

साखर आयुक्तांच्या निर्देशांमुळे आगामी हंगामात शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस कार्यवाही होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. या निर्णयाचे ऊस उत्पादक संघटनेने स्वागत केले असून, विदर्भातील ऊस उत्पादकांना योग्य न्याय मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »