साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारची कडक पावले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या वापरावर आणि बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानुसार महिन्याला १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेची खरेदी करणाऱ्या उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना १५ दिवसांच्या गरजेपेक्षा जास्त साखर साठवून ठेवता येणार नाही.

सरकारने साखर बाजारावर देखरेख वाढविली असून, खाद्यपदार्थ, शीतपेये, बेकरी, मिठाई आणि इतर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करणाऱ्या संस्थांच्या खरेदी व साठ्याची माहिती घेण्यात येणार आहे. संबंधित ग्राहकांना त्यांच्या साखर वापराचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

साखरेचा दर गेल्या काही दिवसांत वाढल्याने केंद्र सरकारने बाजारातील साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, तसेच साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

साखरेचा अनावश्यक साठा करून दरवाढीला चालना मिळू नये, यासाठी सरकारकडून पुढील काळातही बाजारावर लक्ष ठेवले जाणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी साखर व्यापाऱ्यांवरही साठा मर्यादा लागू केली असून, साखरेचा पुरवठा आणि किंमत स्थिर ठेवण्यावर भर दिला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »