सिताराम महाराज कारखान्यात पाच पदांसाठी भरती; नवोदितांनाही संधी

खर्डी (ता. पंढरपूर) : येथील सिताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेडच्या शेती व केनयार्ड विभागात पाच रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये केनयार्ड क्लार्कची चार पदे आणि गव्हाणमेटचे एक पद भरण्यात येणार असून, अनुभवी तसेच नवोदित उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे.
दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी असल्याचे कारखान्याने नमूद केले आहे.
कारखान्याची गाळप क्षमता ५,००० मेट्रिक टन असून, येथे १८ मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्प आणि ११० केएलपीडी क्षमतेचा ज्यूस टू इथेनॉल डिस्टिलरी प्रकल्प आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटामध्ये एकूण अनुभव, शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करावा. बायोडाटा सात दिवसांच्या आत hr.smskl@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.




