भारती शुगर्स अँड एनर्जीमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

सांगली : भारती शुगर्स अँड एनर्जी प्रा. लि., नागवाडी येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, भरतीसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याची प्रतिदिन सुमारे ४,००० मे. टन ऊस गाळप क्षमता असून, को-जनरेशन आणि इथेनॉल प्रकल्पाचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यातील इंजिनिअरिंग, उत्पादन, शेती तसेच इतर विभागांतील विविध पदांसाठी अनुभवी आणि पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
उत्पादन व शेती विभाग २४/०८/२०२६ सकाळी १०.०० वाजता आणि इंजिनिअरिंग विभागासाठी २५/०८/२०२६ सकाळी १०.०० वाजता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.
या भरतीमध्ये असिस्टंट इंजिनिअर, फिटर, क्रेन ऑपरेटर, फॅब्रिकेटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, बॉयलर अटेंडंट, विविध ऑपरेटर आणि तंत्रज्ञ अशा पदांचा समावेश आहे. उत्पादन विभागात लॅब इंचार्ज, लॅब केमिस्ट, क्वालिटी सुपरवायझर, ऑफिसर, इंजिनिअर, ऑपरेटर आणि इतर पदांसाठीही संधी उपलब्ध आहे. तसेच शेती विभागात केनयार्ड सुपरवायझर पदासाठीही भरती करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पात्रता आणि अनुभवाच्या निकषांनुसार आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीच्या तारीख व वेळेनुसार कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस येथे हजर राहावे.उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



