कृषी महाविद्यालयाच्या (खंडाळा) प्राचार्यपदी डॉ. बाळासाहेब पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : जिल्ह्यातील खंडाळा येथे नवे कृषी महाविद्यालय स्थापन झाले असून, बावडा (रामनगर) येथील उच्चशिक्षित डॉ. बाळासाहेब पवार यांची प्राचार्य म्हणून नेमणूक झाली आहे. प्रसिद्ध ऊस संशोधक डॉ. सुरेश पवार यांचे ते बंधू आहेत.

Balasaheb Pawar


डॉ. बाळासाहेब पवार यांचे शिक्षण राजेंद्र कृषी विद्यालयात झाले, नंतर त्यांनी कृषी विद्यापीठ राहुरी येथे उच्चशिक्षण घेतले. त्यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल बावडा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.


डॉ. पवार यांची निवड बावडा ग्रामस्थांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आम्हाला अभिमान आहे की बावडा गावातील पहिले कृषी पदवीधर डॉ. सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कृषी पदवीधर बावडा गावातून झाले, ते फक्त राजेंद्र विद्यालयामुळेच. कृषी महाविद्यालय खंडाळा हे डॉ. बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच महाराष्ट्रातील एक नामांकित कृषी महाविद्यालय होईल, अशा भावना ग्रामस्थानी व्यक्त केल्या आणि प्राचार्य पवार यांना शुभेच्छा दिल्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »