साखर क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. सुरेश भोसले सन्मानित

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साखर उद्योगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो .साखर उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. भोसले यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी तांत्रिक, आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रभावी काम केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनक्षमता वाढवणे, तसेच कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत करणे यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

बदलत्या स्पर्धात्मक वातावरणात त्यांनी कारखान्याला नवे दिशा दिली असून, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या यशाबद्दल परिसरातील शेतकरी, कर्मचारी आणि विविध मान्यवरांकडून डॉ. सुरेश भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »