कोल्हे कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी हनुमंत करवार

अहिल्यानगर । शुगरटुडे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी हनुमंत नवनाथ करवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. करवार यांना सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. ते गेल्या काही दशकांपासून साखर उद्योगात कार्यरत आहेत. कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यासाठी त्यांची साखर क्षेत्रात ओळख आहे. ‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!






