१०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना परवानगी; फ्लेक्स फ्युएलला चालना!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

केंद्र सरकारची मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी

नवी दिल्ली : परकीय चलनाची बचत करणे आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे या उद्देशाने केंद्र सरकारने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स फ्युएल वाहनांना परवानगी दिली आहे. यासाठी मोटार वाहनविषयक नियमांतील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या बांधणीचे निकष, इंजिनचे तांत्रिक तपशील, उत्सर्जन मानके आणि चाचणी प्रक्रियेशी संबंधित तरतुदींमध्ये आवश्यक बदल केले आहेत. यामुळे उच्च इथेनॉल मिश्रणावर तसेच शुद्ध इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणण्याचा मार्ग वाहन उत्पादकांसाठी खुला झाला आहे.

फ्लेक्स फ्युएल म्हणजे काय?

फ्लेक्स फ्युएल वाहने पेट्रोल आणि इथेनॉलच्या वेगवेगळ्या प्रमाणातील मिश्रणावर चालण्यासाठी खास तयार केलेली असतात. ई-८५ इंधनात ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल असते, तर ई-१०० म्हणजे शुद्ध इथेनॉल इंधन.सध्या उपलब्ध असलेल्या सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये उच्च प्रमाणातील इथेनॉल वापरता येत नाही. त्यासाठी इंजिन आणि इंधन प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल असलेले फ्लेक्स फ्युएल वाहन गरजेचे आहे.ई-२० नंतर उच्च इथेनॉल मिश्रणाकडे वाटचालदेशात यापूर्वीच २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोलचे मिश्रण असलेले ई-२० इंधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता ई-८५ आणि ई-१०० सारख्या इंधनांच्या वापराला चालना देण्यावर भर दिला जात आहे.

इथेनॉल हे उसाचा रस किंवा धान्यापासून तयार होणारे जैवइंधन आहे. त्याचा वापर वाढवून पेट्रोलवरील अवलंबित्व आणि कच्च्या तेलाच्या आयातीसाठी होणारा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

वाहन उत्पादकांची तयारी

मारुती सुझुकी इंडियाने ई-२० ते ई-१०० पर्यंतच्या इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालू शकणारी वॅगनआर फ्लेक्स फ्युएल कार सादर केली आहे. टोयोटा, टाटा मोटर्स आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्याही भारतीय बाजारपेठेसाठी फ्लेक्स फ्युएल वाहने विकसित करत आहेत.पर्यायी इंधनांना प्रोत्साहनया बदलांमुळे फ्लेक्स फ्युएल आणि जैवइंधनावर चालणाऱ्या विविध श्रेणींतील वाहनांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. इथेनॉलसोबतच बायोडिझेल आणि इतर पर्यायी इंधनांचा वापर वाढवणे, इंधनपुरवठ्याचे पर्याय विस्तार करणे आणि ऊर्जा सुरक्षितता मजबूत करणे यावरही भर दिला जात आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »