‘निरा-भीमा’ची निवडणूक बिनविरोध

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षांत सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे:
बावडा गट- पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील प्रतापराव सर्जेराव, पाटील उमेश अच्युतराव,
पिंपरी गट – मोहिते प्रकाश शहाजी, बोडके संजय तुळशीराम, विजय दत्तात्रय घोगरेः
सुरवड गट- शिर्के महेशकुमार दत्तात्रय, घोगरे दादासाहेब उत्तम, गायकवाड सुभाष किसन;
काटी गट- पवार लालासाहेब देविदास, जाधव राजकुमार वसंतराव, बाघमोडे विलास रामचंद्र
रेडणी गट- बोंद्र आनंदराव नामदेव, देवकर राजेंद व्यंकट, सवासे दत्तू यशवंत,
अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग – कांबळे राहुल अरुणः
इतर मागास प्रवर्ग -यादव कृष्णाजी दशरथः
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग – नाईक रामचंद्र नामदेव, ‘ब’ वर्ग सभासद प्रवर्ग पाटील भाग्यश्री हर्षवर्धनः महिला राखीव प्रवर्ग: पोळ संगीता दत्तात्रय, शिंदे कल्पना निवृत्ती.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व त्यांना सहायक म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.